Manoj Jarange esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : १९ जानेवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याची मनोज जरांगे यांची मागणी

बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. 'मी आंदोलक असून त्यापूर्वी काही तोडगा निघत असेल तर चांगलंच आहे' असं म्हणत त्यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली.

संतोष कानडे

जालनाः आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. 'मी आंदोलक असून त्यापूर्वी काही तोडगा निघत असेल तर चांगलंच आहे' असं म्हणत त्यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली.

दोघांच्या चर्चेमध्ये सगेसोयरे या शब्दावरुन पुन्हा खल झाला. सगेसोयरे या शब्दाच्या चार व्याख्या तयार केल्या असून त्या सगळ्या व्याख्या प्रशासकीय बाबींमध्ये बसल्या पाहिजेत, त्यावर विचार सुरु आहे, असं यावेळी बच्चू कडू यांनी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, सगेसोयरे या शब्दावर चर्चा झाली आहे आणि मागेल त्याला प्रमाणपत्र द्यावं, यासंदर्भात चर्चा झाली आहे. नुसती चर्चा नाही तर २० तारखेच्या आत हे सगळं करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी आहे की काहीही झालं तरी मुंबईला जायचं आहे म्हणजे आहे.

ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना, सगेसोयऱ्यांना आणि त्याच्या परिवाराला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. हे होईल.. नाही होईल, परंतु आम्हाला २० तारखेला मुंबईला जायचं आहेच. वेळकाढूपणा होऊ शकतो, त्यामुळे जायचं हे ठरलेलं आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी १९ तारखेला विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यानंतर त्यांनी आंदोलनाची रुपरेषा सांगितली. यावेळी त्यांनी प्रत्येक दिवसाचं नियोजन सांगून मराठ्यांनी मुंबईकडे कूच करण्याचं आवाहन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : नवी मुंबईत आकाराला येणार अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'इंडिया ज्वेलरी पार्क'चा शुभारंभ!

Manoj Jarange: ‘कितीही प्रयत्न झाले तरी सत्य बाहेर आणणारच’; ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT