manoj jarange maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : ''दौऱ्यासाठी कुणी पैसे मागितले तर याद राखा'', जरांगे पाटलांनी भरला दम

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा तिसरा दौरा जाहीर केला आहे. १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा तिसरा टप्पा असेल. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून दौऱ्याचा शुभारंभ होईल.

यावेळी जरांगे पाटलांनी १ डिसेंबरपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये साखळी उपोषण सुरु होणार असल्याचं जाहीर केलं आहे. ते म्हणाले की, शाहू महाराजांच्या स्मारकापासून दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी कुणीही कुणाकडे पैसे मागू नयेत, तसं लक्षात आलं तर कारवाई केली जाईल.

जरांगे पाटील म्हणाले की, समाजातील डॉक्टर, शिक्षक, व्यावसायिक, अधिकारी, राजकारणी, श्रीमंत, गरीब कुणीही दौऱ्याच्या नावाखाली कुणाला पैसे देऊ नयेत. हा गरीब मराठ्यांचा लढा आहे, तो मराठे लढत आहेत. लोक स्वखर्चाने दौऱ्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे देणाऱ्यांनीही पैसे देऊ नयेत. कारण त्यामुळे आंदोलनाला डाग लागण्याची शक्यता आहे.

आम्ही कुणालाही खर्च मागत नाही- जरांगे

यापूर्वी झालेले दौरे आणि सभा याचा खर्च कधीच कुणाला मागितलेला नाही. त्यामुळे इथून पुढेसुद्धा कुणी पैसे देऊ नयेत. कुणी म्हणेल, पाटील तसं म्हणत असतात.. त्यांना तसंच म्हणावं लागतं. तरी ऐकू नका आणि पैसे देऊ नका. हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी असून पैसे कमावण्यासाठी नाही, असं जरांगेंनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महागाईचा भडका उडणार? पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG ही महागला...प्रतिकिलो मागे किती रुपयाची वाढ?

Marathi Live News update: नागपूर शहरातील अंबाझरी मार्गावर भलेमोठे झाड कोसळले; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Nagpur Development: ‘नवीन नागपूर’ प्रकल्पाला गती; १७१० एकरवर आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र साकारणार, तकऱ्यांना १३० कोटी मोबदला

Chardham Yatra: बद्रीनाथ धाममध्ये पोहोचला हिंदी अभिनेता! हजारो भाविकांच्या गर्दीत घेतलं दर्शन; सांगितला अविस्मरणीय अनुभव

मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, १० दिवसांत तिसऱ्यांदा वाढले भाव...आता एक लिटर पेट्रोल कितीला?

SCROLL FOR NEXT