महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी घेतली जरांगेंची भेट, लाठीचार्जबाबत दिली महत्वाची अपडेट !

Maratha Reservation: अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांची माहिती

दिलीप पवार

Maratha Reservation : अंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज व दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेचा याचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाईल, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी बुधवारी (ता. सहा) अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे एक सप्टेंबर रोजी पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात वाद झाला होता. पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना हे करत आहेत. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. बुधवारी (ता. 6) अतिरिक्त पोलिस महासंचालक सक्सेना यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली.

दरम्यान अंतरवाली सराटी येथील आमरण  उपोषणाचा आज नववा दिवस असून बुधवारी सकाळी 8 वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आरोग्य विभागाकडून उपोषणस्थळी सलाईन लावण्यात आली आहे.

घटना स्थळी महासंचालक संजय सक्सेना यांच्यासह, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट घेऊन आंदोलन करते जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात 5 दिवसांत मोठी घसरण! उच्चांकापासून तब्बल 33 हजारांनी स्वस्त; दसऱ्याआधी पाहा ताजा भाव

Distance Education: राज्यात दूरस्थ शिक्षण घेणारे वाढले ;केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचा अहवाल

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Marathi News Live Updates: मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी, कार्यकर्त्यांकडून सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित

SCROLL FOR NEXT