Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ओबीसीतून आरक्षण नाहीच; भुजबळ यांची जरांगे यांच्यावर टीका

‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, याची काळजी सरकारने घ्यावी. अमूक तारखेपर्यंत आरक्षण मिळालेच पाहिजे, ही मागणी बालिश आहे.

सकाळ वृत्तसेवा

बीड - ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, याची काळजी सरकारने घ्यावी. अमूक तारखेपर्यंत आरक्षण मिळालेच पाहिजे, ही मागणी बालिश आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही’, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता शनिवारी सुनावले.

ओबीसी एल्गार सभेत भुजबळ बोलत होते. माजी मंत्री महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, नारायण मुंडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. भुजबळ म्हणाले, ‘आज गोपीनाथ मुंडे असते तर हे प्रश्न निर्माण झालेच नसते. ते नसल्यानेच ओबीसींच्या मागे संकटांची मालिका सुरू आहे.

बीडमध्ये विचारपूर्वक नियोजन करून जाळपोळ, हिंसाचार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सर्वच जाती-धर्माचे मावळे होते. आता महाराजांचे नाव घेत लोकांची घरे फुंकता हे शोभत का?’ असा सवालही त्यांनी केला.

जानकरांनी धरले पाय

‘गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे महाराष्ट्राचा हुंकार आहेत. आता गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न छगन भुजबळ यांनी पूर्ण करावे. त्यांनी मुख्यमंत्री व्हावे,’ असे म्हणत महादेव जानकर यांनी भाषण थांबवून छगन भुजबळ यांचे पाय धरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT