manoj jarange maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : बीडमध्ये अधिकाऱ्यांविरोधात लोक रस्त्यावर येण्याची शक्यता; मनोज जरांगेंनी सरकारला दिला 'हा' इशारा

संतोष कानडे

जालनाः बीडमध्ये ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांकडून निरपराध लोकांनाही गुन्हेगार म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात गोवलं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

एकीकडे अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु असताना दुसरीकडे बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. निमित्त होतं आमदार प्रकाश सोळंके यांची ऑडिओ क्लिप. प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वक्तव्य केल्याने संतप्त जमावाने त्यांच्या घराच्या परिसरात जाळपोळ केली.

त्यानंतर बीड शहरात राष्ट्रवादी भवन पेटवून देण्यात आलं. कहर म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर आणि संपूर्ण क्षीरसागर कुटुंब ज्या घरात वास्तव्याला आहे, त्या घरालाही आग लावण्यात आली. त्याचबरोबर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष सुभाष राऊत यांचं हॉटेल आणि इतरही ठिकाणी जाळपोळ, दगडफेक झाली.

या प्रकरणी पोलिस मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहेत. परंतु आरोप असा आहे की, या कारवाईत काही निरपराध आणि ज्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही अशांना केवळ द्वेषापोटी आरोपी केलं जात आहे. मराठा समाजाली तरुणांना या गोवलं जात असल्याचा ठपका पोलिसांवर ठेवण्यात येत आहे.

या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारने दोन दिवसांमध्ये अशा कारवाया थांबवाव्यात नसता बुधवारी नाईलाजाने संबंधित अधिकाऱ्यांची नावे जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यानंतर मराठा समाज रस्त्यावर उतरेल, त्यामुळे सरकारने शांतता भंग होऊ नये यासाठी अशा कारवाया थांबवाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं.

जरांगे पुढे म्हणाले, बीडमधील हिंसाचाराच्या प्रकरणात जे खरे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. परंतु इतर मराठा समाजातीली तरुणांना लक्ष्य केलं जात आहे. मी सरकारच्या कानावर ही बाब घातलेली असून मराठा समाज आक्रमक झालाय, लोक रस्त्यावर उतरणार आहेत. सरकारने दोन दिवसांमध्ये अशा कारवाया थांबवाव्यात, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar Net Worth : डी. के. शिवकुमार देशातील 'सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री! 5 वर्षांत संपत्तीत 500 कोटींची वाढ, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल

West Bengal Political Crisis : ममतांना मोठा धक्का, 60 बंडखोरांनी मांडली वेगळी चूल; गटनेते पदी ऋतब्रत यांची निवड, पक्ष चिन्हावरही केला दावा

दक्षिण मुंबईत वीज संकट! BEST अ‍ॅक्शन मोडमध्ये; 690 कर्मचाऱ्यांची भरती होणार, वारंवार बत्तीगुल होत असल्याने मोठा निर्णय

इतके उद्योग करूनही 'कमळी' अखेर परीक्षेत पास झालीच; किती टक्के मिळाले माहितीयेत? प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का

Latest Marathi News Live Update: दहा शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचं केबल चोरीस

SCROLL FOR NEXT