ramdas athawale esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : रामदास आठवलेंची मराठा आरक्षणावर पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसी कोट्यातून...

संतोष कानडे

मुंबईः जालन्यातल्या अंतरवालीमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटल्यानंतर आता राज्यभरात मराठा समाजबांधव पेटून उठलेले दिसून येत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत. आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान केलंय.

रामदास आठवले म्हणाले की, जालन्याच्या अंतरवाली गावात मनोज जरांडे पाटील उपोषणाला बसलेत त्यांची मागणी रास्त आहे. मराठा समाजात मागासलेली कुटुंब आहेत त्यांना आरक्षण द्यावं लागेल. ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, असं त्यांचं मत आहे. ओबीसींच्या आरक्षणात वाढ करून मराठा समाजाला त्यात टाकता येत का, हे बघावं किंवा वेगळा विचार होतो का हेही पाहावं; असं आठवले म्हणाले.

रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, राज्य सरकार आरक्षणाच्या मुद्यावर सकारात्मक आहे. मी आज रात्री जरांडे पाटील यांना भेटून पाठिंबा जाहीर करणार आहे. माझ्या पक्षाची मागणी आहे की, जातीनिहाय जनगणना केली तर सगळ्या जातींचा टक्का समजेल आणि त्यांचा त्यांचा वाटा त्यांना मिळेल. केंद्र सरकारने त्याचा विचार करावा, असंही रामदास आठवले म्हणाले.

''देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली होती. त्यामुळं उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी केलेली टीका ही राजकीय आहे. आम्ही सगळे भारतीय आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे. भारत हे नाव ओरिजनल आहे, INDIA हे इंग्रजी नाव आहे, त्याला विरोधकांनी विरोध करणे चुकीचं असल्याचंही आठवलेंनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईकर घामाने भिजणार! पुढील ३ दिवसात तापमानात मोठे बदल होणार; हवामान विभागाचा नवा अंदाज

Latest Marathi News Live Update : सेव्हन लव्ह चौकात दोन गटांत तूफान मारामारी

Female Judge Dowry FIR : महिला न्यायाधीशाचा ३० लाखांच्या हुंड्यासाठी छळ, इंजिनिअर पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

Gokul Election: गोकुळ’साठी आज चुरशीने मतदान, सहा बोटांना शाई शक्य

Ethanol Production,: साखरेपासून इथेनाॅल निर्मितीवर बंदी;मक्यापासून निर्मित इथेनाॅलच्या भावातही कपात

SCROLL FOR NEXT