महाराष्ट्र बातम्या

आंबोली आणि चिखलदरा येथे तीन पर्यटक दरीत कोसळले

सकाळवृत्तसेवा

आंबोली : दरीच्या ठिकाणी मौजमजा करताना तोल जाऊन दोन तरुण दरीत कोसळल्याची घटना आंबोली घाटात घडली आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथील एक पर्यटक तरुण दरीत पडला असून, दोन्ही ठिकाणच्या पर्यटकांचा शोध अद्याप सुरू आहे. 

प्रताप राठोड (वय २१, रा. बीड), इम्रान गारदी (वय २६, रा. गडहिंग्लज - भडगाव) अशी कावळेसाद पॉईंटच्या खोल दरीत पडलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. 

खोल दरीत पडलेले दोन तरुण आणि अवधूत देवरकर, राजेंद्र चोरगे, ध्यानु पाटील, रमेश देसाई, श्रीधर मगधूम (सर्व रा. गडहिंग्लज) हे एकत्र मिळून कावळेसाद पॉईंटवर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटायला आले होते. 

जेवताना प्रताप राठोड, इम्रान गारदी हे दोघे तरुण मध्येच उठून फोटो काढण्यासाठी दरीच्या ठिकाणी गेले होते. ते उशिरापर्यंत आले नाहीत म्हणून सहकाऱ्यांनी शोधाशोध करण्यास सुरवात केली. दरीच्या ठिकाणी मौजमजा करताना दरीत तोल जाऊन ते तरुण दरीत कोसळल्याची माहिती एका महिलेने दिली. दाट धुक्यामुळे त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने अखेर त्या सहकाऱ्यांनी आंबोली पोलिस दूरक्षेत्र गाठलं. जीवरक्षक बाबल आल्मेडा आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. रात्र झाल्यामुळे शोधकार्यात व्यत्यय आला. त्यानंतर आज (मंगळवार) सकाळपासून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

अमरावती : चिखलदरा पंचबोल दरीत पर्यटनासाठी आलेला युवक पडला. अकोला जिल्ह्यातील कारंजा रमजानपुर येथील 8 मित्र आले होते फिरायला. पाय घसरल्याने 100 फुट दरीत युवक कोसळला. शोध सुरू आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT