Marathwada Vidarbha rain imd alert unseasonal rain today latest marathi update update  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update : आज राज्याच्या ‘या’ भागांमध्ये कोसळणार अवकाळी पाऊस! मराठवाडा-विदर्भासाठी हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Rain Latest Update :मागील काही दिवसात देशातील वेगवेगळ्या भागातील वातावरणात बदल जाणवत आहेत.

रोहित कणसे

Maharashtra Rain Latest Update : मागील काही दिवसात देशातील वेगवेगळ्या भागातील वातावरणात बदल जाणवत आहेत. उत्तरेकडील राज्यामंध्ये थंडीचा कडाका वाढलेला असतानाच हवामान विभागाने राज्यात पावसाचा इशारा जारी केला आहे. येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत मध्य आणि पूर्व भारतात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहेत.

हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातअवकाळी पाऊस सांगण्यात आला होता. यानंतर मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत, तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट देखील झाली.शनिवारी विदर्भातील, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर परिसरात हा पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील देवळी शनिवारी दुपारी तुफान गारपीट झाली.

आज कुठे होणार पाऊस?

राज्यात काही जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामध्ये जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा तसेच नागपुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. इतर काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही यावेळी देण्यात आला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के एस होसाळीकर यांनी आजच्या हवामान अंदाजाबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजामुसार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड आणि लातूर या भागात हलक्या स्वरुपाचा. तर जालना, हिंगोली, परभणी येथे वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT