Meeting on Varsha Bungalow Esakal
महाराष्ट्र बातम्या

Meeting on Varsha Bungalow: भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या बैठकीआधी महाराष्ट्रात मध्यरात्री राजकीय खलबतं; कोणत्या मुद्द्यावर झाली चर्चा?

Meeting on Varsha Bungalow: आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची राजधानी दिल्लीत बैठक पार पडणार आहे. अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत राज्यातील काही महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीआधी महाराष्ट्रात मध्यरात्री राजकीय खलबतं दिसून आली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्याच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहे. बैठका, मतदारसंघात चाचपणी, जागावाटप, दावे-प्रतिदावे हे सर्व सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका भरून काढण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची राजधानी दिल्लीत बैठक पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील काही महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीआधी महाराष्ट्रात मध्यरात्री राजकीय खलबतं दिसून आली.

काल(सोमवारी) मध्यरात्री वर्षा बंगल्यावर दीड तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा झाली. संभाव्य जागांची यादी घेऊन आज देवेंद्र फडणवीस केंद्रातील नेत्यांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातील ज्या-ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, त्या राज्यांच्या भाजपच्या नेत्यांची आज केंद्रात महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.

दरम्यान, मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मंत्रीमंडळ विस्तार आणि आगामी विधानसभा निवडणूकीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार करण्याचा महायुतीचा मानस असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुका लक्षा घेता, महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीतील मित्र पक्षांसोबत मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती साम टिव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तर लोकसभा निवडणुकीतील राज्यातील अपयशानंतर दिल्लीत होत असलेल्या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट, राज्यातील महायुतीला मिळालेल्या कमी जागा यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती आणि संभाव्य जागावाटप यावर देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या राजीनाम्याच्या घोषणेवर देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत.

बैठकीला उपस्थित राहणारे नेते

देवेंद्र फडणवीस

चंद्रशेखर बावनकुळे

रावसाहेब दानवे

चंद्रकांत पाटील

आशिष शेलार

विनोद तावडे

सुधीर मुनगंटीवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT