Meri Maati Mera Desh 
महाराष्ट्र बातम्या

Meri Maati Mera Desh: मोदींच्या संकल्पनेतील कार्यक्रमाला CM हजर पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी; चर्चेला उधाण...

Sandip Kapde

Meri Maati Mera Desh: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील  माझी माती माझा देश (मेरी माटी मेरा देश) उपक्रमांतर्गत आयोजित अमृत कलश यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

गावागावातून माती कलश यात्रेत आणण्यात आले आहे. या यात्रेत सर्व लोक सहभागी झाले आहेत. आज स्पेशल ट्रेन दिल्लीला रवाना होईल. यामध्ये सर्व कलश दिल्लीला नेण्यात येतील. (Latest Marathi News)

ऑगस्ट क्रांती मैदानात आज अमृत कलश यात्रेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राचा विविध जिल्ह्यांतून संकलित केलेली माती अमृत वाटिकेसाठी आज दिल्लीला रवाना होणार. शेकडो स्वयंसेवक मातीचे कलश घेऊन दिल्लीला जाणार आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस व अजित पवार गैरहजर असल्यामुळे मोठी चर्चा झाली. कार्यक्रम पत्रिकेत नाव असताना फडणवीस कार्यक्रमास अनुपस्थित होते.

या कार्यक्रमात एकनाथ शिंदे म्हणाले, आज हा आपल्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. हे मैदान देखील ऐतिहासिक आहे.  चले जाओ चा नारा इकडे घुमला आणि ब्रिटिशांना भारत सोडावा लागला. आपल्या प्रणांची आहुती देणाऱ्या स्मृतींना मी अभिवादन करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT