minister Chhagan Bhujbal in trouble in the case of Maharashtra Sadan scam knp94 
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांना धक्का? महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भुजबळांसोबतच्या या तिन्ही आरोपींनी यासंदर्भात अर्ज केला असून कोर्टाने याप्रकरणी सुनावणी घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे भुजबळांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. ( minister Chhagan Bhujbal in trouble in the case of Maharashtra Sadan scam)

छगन भुजबळ यांनी या प्रकरणी आरोपातून मुक्त करावं यासाठी याचिका दाखल केली होती. यावर कोर्टात सुनावणी सुरु होती. पण, तीन आरोपींनी ही सुनावणी थांबवून माफीचा साक्षीदार होण्याच्या मुद्द्यावर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. त्यानंतर कोर्टाने अर्जावर सुनावणी येणाची तयारी दाखवली आहे. त्यामुळे येत्या काळात भुजबळ यांच्या अचडणी वाढू शकतात.

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं अर्जावर सुनावणी घेण्यास मंजुरी दिलीये. याप्रकरणी सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज अटकेत आहेत. या तिघांनी न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्यासमोर माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. न्यायमूर्तींनी तिन्ही आरोपींची मागणी मान्य केलीये.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण काय आहे?

दिल्लीतील महाराष्ट्र सदन इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती. संबंधित कंपनीने इतर कंपनीला विकासाचे हक्क विकले. पहिल्या कंत्राटदार कंपनीने अपेक्षेपेक्षा प्रचंड नफा कमावला. यात १३ कोटी ५० लाख भुजबळ कुटुंबियांना मिळाल्याचा दावा भ्रष्टाचार विरोधी पथकाने केला. त्यानंतर ईडीनेही याप्रकरणी कारवाई केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT