महाराष्ट्र बातम्या

'भ्याड हल्ला करणाऱ्या कन्नड गुंडांना लवकरात-लवकर अटक करा'

निषेधार्थ समितीतर्फे बेळगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

निषेधार्थ समितीतर्फे बेळगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

बेळगाव - कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी बेळगावातील व्हॅक्सिन डेपो येथे सोमवारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. (Belgaum News) यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे (Maharashtra ekikaran samiti) अध्यक्ष दीपक दळवी (Deepak dAlavi) यांच्यावर कन्नड गुंडांनी भ्याड शाईफेक हल्ला केला होता. याच्या निषेधार्थ समितीतर्फे बेळगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेसंदर्भात राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. याबद्दल त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. यात ते म्हणतात, महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तसेच या घटनेच्या निषेधार्थ एकीकरण समितीने पुकारलेल्या बेळगाव बंदला पाठिंबा जाहीर करतो. अशाप्रकारे केलेल्या भ्याड हल्ल्याने सीमा भागातील मराठी भाषिकांचे आंदोलन चिरडता येणे शक्य नाही. उलट अशा हल्ल्यामुळे मराठी भाषिकांची चळवळ आणखी जोमाने उभी राहील, यात कोणतीही शंका वाटत नाही. बेळगाव पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेल्या गुंडांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या लढ्यात महाराष्ट्र राज्य सोबत असल्याची ग्वाही सीमावर्ती भागातील नागरिकांना त्यांनी दिली आहे

बेळगावात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra ekikaran samiti) पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. (Belgaum update) शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. अनेक गावातील बससेवाही खंडित झाली असून बंदचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. (Belgaum Band)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT