Rahul Narwekar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqaulification : निकाल उशिरा लावण्यासाठी अध्यक्ष 'घाना'ला जाताहेत; ठाकरे गटाची टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण अनेक दिवसांपासून सुरु आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेण्यात कोणतीही दिरंगाई होणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. मात्र अजुन त्यावर निर्णय लागलेला नाही. त्यातच आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, घाना या शहरात देखील लोकशाही अस्थिर असते. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तिथे लोकशाहीवर प्रवचन द्यायला जात आहेत. महाराष्ट्रामध्ये लोकशाही घाण्याला जुंपून जात आहात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तारखांवर तारखा देऊन घटनाबाह्य सरकार चालवत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान आठ दिवसात निकाल लावा असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. निकालाला उशीर करायचा, म्हणुन ते घानाला जात आहेत. ही आपल्या देशातील लोकशाहीची हत्या, असल्याची टीकाही राऊत यांनी केली.

मुंबईत मराठी माणसाला घर न देण्याच्या घटनेवर राऊत म्हणाले की, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी लढणाऱ्यांची ताकद कमी व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

PM मोदींचा VIDEO अन् नड्डांची भेट, वांगचुक यांचं उपोषण मागे; पण CJPचे आंदोलन सुरूच, प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम

आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ लाख! पंढरपूर तालुक्यातील ‘या’ ७ शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कर्जमुक्तीचे सातबारा, पंढरपूर बाजार समितीत कृषी महोत्सव

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT