Raj Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackrey : राज ठाकरेंचा अयोधा दौरा रद्द करण्यामागे भाजपचा हात, मनसे नेत्याच्या विधानाने खळबळ

मनसेच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यात एका मुलाखती दरम्यान राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदींना देशातील सर्व राज्ये समान आहेत पण मोदी केवळ गुजरातकडेच लक्ष देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. राज ठाकरे यांनी कालच ही टीका केली असतानाच मनसेच्या आणखी एका बड्या नेत्याने राज ठाकरे यांचा अयोध्येच्या दौऱ्यावरून भाजपवर टीका केली आहे.

राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा रद्द होण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. त्यांच्या या खळबळ उडाली आहे. तसेच मनसे आणि भाजपमध्ये सगळं अलबेल आहे की नाही? अशी चर्चा या दाव्यामुळे सुरू झाली आहे.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

प्रकाश महाजन बोलताना म्हणाले की, राज ठाकरेंनी हिंदूत्वाची भूमिका स्वीकारली तेव्हा भाजपाच्या एका टिनपाट गुंडाने अयोध्येत न येण्याची राज यांना धमकी दिली. तेव्हा ही लोकं गप्प होती. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्याच्या पापात भाजप सामिल आहे, असा आरोप महाजन यांनी केला आहे.

तर पुढे त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारलाही एक प्रकारे इशारा दिला आहे. तर बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी एवढ्या थराला जातेय की भावा भावत भांडण लावत आहे. आता नवीन सरकार आल्यानंतर सर्व लोक शिवतीर्थवर येतात. मात्र या सरकारला काही वाटत नाही की राज ठाकरेंवर असलेल्या खोट्या केसेस मागे घ्याव्यात. जर राज ठाकरे यांच्यावरील केसेस मागे घेतल्या नाही तर या शिंदे-फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवून देवू, असा इशारा महाजन यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण; टिळक रोडवर नेमकं काय घडलं?

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मंठ्यात रास्ता रोको; मराठा समाज आक्रमक, फाट्यावर वाहनांच्या रांगा

Business Success Story: यूट्यूब ठरला गुरु! व्हिडिओ बघून शिकला सँडविच, आता वर्षाला कमावतो कोट्यवधी

Marathi News Live Updates : विद्यानंद बापट यांना बेदम मारहाणीचा पुणेकरांकडून निषेध

Six Year Old Protest : आई-वडिलांसाठी ६ वर्षांच्या आदित्यचे अनोखे आंदोलन; म्हणाला- पंतप्रधान मोदींची भेट झाल्याशिवाय माघार नाही, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT