Prabodhankar Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: प्रबोधनकारांच्या पुण्यतिथीदिनी राज ठाकरेंची 'खास' पोस्ट; म्हणाले त्यांचा ठाकरी बाणा...

प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे

सकाळ डिजिटल टीम

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील खंदे शिलेदार, समाजसुधारक, पत्रकार प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे. दरम्यान या निमित्ताने त्यांचे नातू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबोधकार ठाकरे यांना अभिवादन करणारी एक पोस्ट लिहिली आणि जुना फोटो पोस्ट केला आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे स्वभावगुण आणि वैशिष्ट्ये सांगत त्यांनी दिलेला 'ठाकरी' बाणा, जो माझ्यासह पुढच्या पिढीत आला आहे, असं राज आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात.

फेसबूक पोस्टमध्ये राज ठाकरे लिहतात की, आज आमच्या आजोबांची - प्रबोधनकारांची पुण्यतिथी. अन्याय दिसला तर लाथ मारायची, जे खरं असेल ते ठासून मांडायचं, आणि हे करताना नफा, नुकसान असल्या क्षुल्लक गोष्टींचा विचार करायचा नाही, हा आजोबांनी दिलेला 'ठाकरी' बाणा, जो पुढच्या पिढीत आला आणि माझ्यातपण आला. मी आजोबांनी रुजवलेला हा ठाकरी बाणा कायम कटाक्षाने अंमलात आणायचा प्रयत्न करत आलोय आणि पुढे पण करत राहीन. आणि हेच बाळकडू पुढे पण देईन हे नक्की, असा विश्वास व्यक्त करतानाच राज यांनी आजोबांच्या स्मृतीस अभिवादन केलं आहे.

दरम्यान आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आज एकाच व्यासपीठावर असणार आहेत. निमित्त आहे ते 'प्रबोधनकार डॉट कॉम' या संकेतस्थळाच्या लोकार्पणाचे प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Threat : रणवीर सिंग नंतर आता सलमान खानच्या निकटवर्तीय अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, कोट्यावधींची मागितली खंडणी

Satara Politics: सातारा जिल्ह्यात ‘सत्ता’खल! राष्‍ट्रवादी-शिवसेनेत खलबते; संजीवराजे ऑनफिल्‍ड, नेमकं काय ठरलं?

Maha Shivratri 2026 Rashifal: भगवान महादेवाच्या 'या' चार राशी आहेत प्रिय! महाशिवरात्रीला होऊ शकतो प्रचंड आर्थिक लाभ

मोठी बातमी! गुंठ्यावरील बांधकामांसाठी आता लगेच तात्पुरती मंजुरी अन् ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रही; नगररचना विभागाचा आदेश, कोठे करायचा अर्ज? वाचा...

Kid Friendly Recipes: राजमा भात खाऊन कंटाळा आलाय? चवीत बदल हवा असेल तर हे 2 सोपे पदार्थ नक्की बनवा

SCROLL FOR NEXT