mns raj thackeray on narayan rane during ankita walawalkar meet marathi content creators watch video  
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray Video : आम्ही आजपर्यंत शिंदुदुर्गच ऐकतोय; राज ठाकरेंचा राणेंना मिश्कील टोला

सकाळ डिजिटल टीम

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच प्रसिद्ध मराठी कंटेंट क्रिएटर्सची भेट घेतली . यामध्ये अंकिता वालावकर हिच्यासोबतच नील, सिद्धांत सरफरे, निखिल धवंडे आणि अन्य क्रिएटर्सटा समावेश होता. कंटेंट क्रिएट्सच्या या भेटीदरम्यान सिंधुदुर्ग उच्चारावरवून राज ठाकरेंनी केलेली कोटी ऐकून सोशल मीडिया क्रिएटर्सना हसू अवरता आलं नाही.

सोशल मीडियावर प्रसिध्द असलेल्या या कंटेंट क्रिएटर्सनी राज ठाकरेंची भेट घेतली तेव्हा शर्मिला ठाकरे आणि मनसे नेते अमेय खोपकर हे देखील उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी भाजप नेते नारायण राणे यांचा एक मजेशीर किस्सा सांगीतला.

नेमकं काय झालं?

या व्हिडीओत कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता ही राज आणि शर्मिला ठाकरे यांनी तिने आणलेल्या गिफ्टबद्दल माहिती देताना दिसतेय. यावेळी अचानक राज ठाकरेंनी बसलेल्या सर्व क्रिएटर्सना तुमच्यापैकी सिंधु-दुर्ग असं किती जण म्हणतात? असा प्रश्न विचारला.

यावर अंकिताने सगळे म्हणतो असं उत्तर दिलं. पुढे राज ठाकरे म्हणाले की, कारण आम्ही ऐकतो ते शिंदुदुर्गच ऐकतो . यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या की कळलं नाही. यावर राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, आम्ही नारायण राणे यांच्याकडून आजवर शिंदुदुर्ग असंच ऐकत आलोय यावर सर्व क्रिएटर्समध्ये एकच हशा पिकला.

हेही वाचा - तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

अंकिता वालावलकरने राज ठाकरे यांची भेट घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अंकिताचा हा व्हिडिओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोबतच अंकिताने तिच्या यूट्यूब चॅनवर या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती राज ठाकरेंसोबतच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती देताना दिसत आहे. सोशल स्टार म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या अंकिताच्या या व्हिडिओला देखील चाहत्यांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे.

अंकिता आहे तरी कोण?

अंकिता वालावलकर ही सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहे. ती 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून प्रसिद्ध आहे. अंकिता फूड आणि टुरिझमवर व्हिडिओ बनवते. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवर त्याचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जीवदान मिळालं, तरी गणित फसलं! विक्रमांचा पाऊस पाडणारा Virat Kohli कसा बाद झाला पाहा... Video Viral

Woman Mountaineer : पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी ‘माऊंट मेंटोक कांग्री-२’ शिखरावर फडकवला तिरंगा

Latest Marathi News Live Update : केतन अन् सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT