MNS sandeep Deshpande slams sanjay raut over sawarkar lokmanya tilak statement Maharashtra Politics  sakal
महाराष्ट्र बातम्या

MNS On Sanjay Raut: सावरकर, टिळक स्वातंत्रसैनिक; तुमच्यासारखे…; मनसेची राऊतांवर चहुबाजुने टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल तीन महिन्यांपेक्षा अधिक काल तुरुंगात घालवल्यानंतर जामिनावर सुटका झाली. त्यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपले जेलमधले काही अनुभव सांगितले. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी आपण सावरकर, टिळक यांच्याप्रमाणे जेलमध्ये राहिलो असल्याचं सांगितलं. यावरून मनसे नेते संदिप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

"आज सामनाकारांची पत्रकार परिषद बघितली स्वतःची तुलना ते सावरकर, लोकमान्य यांच्या बरोबर करत होते इंग्रजांनी त्यांना पन्नास लाखांचा गफला केला होता म्हणून अटक नव्हती केली ते स्वातंत्र सैनिक होते तुमच्या सारखे घोटाळे बाज नव्हते." असे संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे.

तसेच मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील व्हिडिओ ट्विट करत "वाघ आला वाघ आला करत होते ना मग हि मांजर कुणाची सुटलीये!!" अशा खोचक शब्दात राऊतांवर टीका केली होती. दरम्यान तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राऊत पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत, त्यांनी आज उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

राऊत काय म्हणाले होते?

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी तुरुंगामधील अनुभव सांगताना म्हटले होते. बोलताना राऊत म्हणाले होते की, "मी विचार करायचो की सावरकर १० वर्षांपेक्षा जास्त कसे राहिले असतील, टिळक कसे राहिले असतील, वाजपेयींपासून अनेक लोक कसे राहिले असतील. पण जे राजकारणात असतात, त्यांना कधी ना कधी जेलमध्ये जावंच लागतं. "

यावेळी राऊतांनी राज ठाकरेंना टोलाही लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, "राज ठाकरेंनी एका भाषणात माझ्यावर टीका करताना सांगितलं होतं की आता संजय राऊतांना ईडीकडून अटक होणार. आता राऊतांनी स्वतःशीच बोलण्याची प्रॅक्टिस करावी. हो केली मला अटक ईडीने आणि ती बेकायदेशीर होती. आपण शत्रूबद्दलही अशी भावना करू नये. सावरकर, टिळक ज्याप्रमाणे एकांतात होते, त्याप्रमाणे मीही एकांतात होतो. माझी अटक राजकीय होती. मी माझा एकांत सत्कारणी लावला आहे. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT