mohan yadav  sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Vardhapan Din 2024: ठाकरेंचा असा शिवसैनिक ज्याने पक्षासाठी दिलं सर्वस्व, कपडेही घालतो भगवे 

Pune: पुणे येथील एका सभेमध्ये बाळासाहेबांचे विचार ऐकले व बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झाले.|

सकाळ वृत्तसेवा

प्रकाश शेलार

Daund: नानगाव तालुका दौंड येथील ६० वर्षीय मोहन यादव गेली २३ वर्षांपासून प्रपंचावर तुळशीपत्र ठेवत स्वतःच्या दुचाकीवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रथ बनवत संपूर्ण महाराष्ट्रभर हजारो किलोमीटर भ्रमंती केली आहे.

शिवसेना व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार पोहचवण्याचे काम ते करीत आहेत. शाळेची पायरी न चढलेल्या यादव यांनी लहानपणी पुणे येथील एका सभेमध्ये बाळासाहेबांचे विचार ऐकले व बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झाले.

तेव्हापासून त्यांनी बाळासाहेबांचा विचार महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या पल्सर दुचाकीला भगवा रंग देत दुचाकीचा रथ तयार केला. अंगामध्ये भगवी कपडे, भगवा बूट, भगवे घड्याळ डोक्यावरती भगवी टोपी घालत संपूर्ण देशभरात ५ लाख किलोमीटर भ्रमंती केली आहे.रथावरती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय मीनाताई ठाकरे व ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. जेथे बाळासाहेबांची सभा असेल तेथे मोहन यादव यांची उपस्थिती ठरलेली असायची.

सदर रथ घेऊन मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी मोहन यादव हे २००३ मध्ये सर्वप्रथम बाळासाहेबांना भेटले. बाळासाहेबांनी मोहन यादव यांचे कौतुक करत त्यांना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपला नवस फेडण्यासाठी रथ घेऊन मोहन यादव यांनी आयोध्या मंदिरासह देशभरातील बहुतांशी हिंदू मंदिरांना भेटी देत देवतांचे दर्शन घेतले. २००६ मध्ये नानगाव येथे छोटे किराणा मालाचे दुकान सुरू केले .या दुकानाला राज उद्धव ठाकरे किराणा स्टोअर्स असे नाव दिले. ठाकरे कुटुंबावरिल‌ प्रेमापोटी मोहन यादव यांनी आपल्या दोन मुलांची नावे राज उद्धव ठेवली आहेत.

कुटुंबातील पत्नी सुनिता यादव व मुलगी स्वाती चौधरी या सुद्धा यादव यांना पाठिंबा देत आहेत. नुकतीच मोहन यादव यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी उद्धव ठाकरे यांनी नवीन रथ बनवण्यासाठी नवीन पल्सर गाडी यादव यांना भेट दिली.

मध्यंतरी प्रवास करत असताना जीवघेणा अपघातातून यादव बचावले आहेत त्यांच्यावरती छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत तरीसुद्धा शिवसेना उबाठा पक्षावरील प्रेम तसुभर देखील कमी झाले नाही.ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये ठाकरे कुटुंबीय व शिवसेना उबाठा गटाचे विचार पोहचवण्याचे काम ते अविरतपणे करत आहेत.

शिवसेनेवरील व ठाकरे कुटुंब यांच्या प्रेमापोटी माझे नानगाव येथील राहते घर व जमीन सोडावी लागली . सध्या मी केसनंद तालुका हवेली येथे राहत आहे. या रथामुळे व ठाकरे कुटुंबियांच्या प्रेमापोटी मला महाराष्ट्रभर ओळख मिळाली आहे. ठाकरे कुटुंबीय हे माझ्यासाठी पंढरीचे विठोबा असून मी त्यांच्यासाठी वारकरी आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक राहणार आहे.

मोहन यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT