Maharashtra Monsoon sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Monsoon : सुखसरींचा वर्षाव! ; मॉन्सून राज्यात दाखल,सोलापूरपर्यंत मजल

दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरुवारी दाखल झाले. धरणातील पाण्याची वेगाने कमी होणारी पातळी, शहरांवर पाणीकपातीची टांगती तलवार, ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट, यामुळे राज्यातील प्रत्येकाचे डोळे ‘मॉन्सून’च्या प्रगतीकडे लागले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरुवारी दाखल झाले. धरणातील पाण्याची वेगाने कमी होणारी पातळी, शहरांवर पाणीकपातीची टांगती तलवार, ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट, यामुळे राज्यातील प्रत्येकाचे डोळे ‘मॉन्सून’च्या प्रगतीकडे लागले होते. अखेर मॉन्सूनने राज्यातील रत्नागिरी, सोलापूर येथे दमदार हजेरी लावली. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पुण्या-मुंबईसह राज्याच्या इतर भागांत ‘मॉन्सून’ मुसंडी मारेल, असा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी व्यक्त केला.

मॉन्सून ३० मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर सहा दिवस प्रवास करत त्याने कर्नाटक, गोवा मार्गे तळकोकणात प्रवेश केला. एकाच दिवसात मॉन्सूनने रत्नागिरी, सोलापूर, मेढक, भद्राचलम, विजयनगर येथे हजेरी लावली. पुढील दोन दिवसांत विविध भागांमध्ये मॉन्सूनची दमदार हजेरी लागेल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

अरबी समुद्रातून प्रवाहाचा वेग अधिक बळकट होत असल्याने मोसमी वारे भारत भूमीवर प्रवास करत आहेत. केरळमध्ये वेळेआधी (३० जून) दाखल झाल्यानंतर वेग धरलेल्या मॉन्सूनने मंगळवारी (ता. ४) सर्वसाधारण वेळेच्या एक दिवस आधीच गोव्यासह कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. त्यानंतर गुरुवारी मॉन्सूनने गोव्याचा उर्वरित भाग, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणाच्या बहुतांश भागांसह महाराष्ट्रात प्रगती केली. महाराष्ट्रातील संपूर्ण सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांतही मॉन्सूनने प्रगती केली आहे.

चार दिवस आधीच दाखल

तळकोकणासह महाराष्ट्रात साधारणतः चार दिवस आधीच मॉन्सून दाखल झाला आहे. पोषक हवामान असल्याने दोन ते तीन दिवसांत उर्वरित कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, छत्तीसगड, दक्षिण ओडिशाच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT