Monsoon sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon : संपूर्ण राज्यातून बाहेर पडला मॉन्सून

परतीच्या प्रवासावर असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता. ९) देशाच्या बऱ्याच भागातून तसेच जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून बाहेर पडले आहेत.

अक्षता पवार

पुणे - परतीच्या प्रवासावर असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता. ९) देशाच्या बऱ्याच भागातून तसेच जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून बाहेर पडले आहेत. दरम्यान कोकण आणि विदर्भातील तुरळक भागातून अद्याप मॉन्सून परतलेला नाही. दरम्यान परतीसाठी पोषक वातावरण असून मॉन्सून लवकरच संपूर्ण देशातून बाहेर पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मॉन्सूनच्या परतीसाठी सुमारे २ आठवड्यांचा विलंब झाल्याचे दिसून आले. यंदा मॉन्सूनच्या आगमनाला त्याचबरोबर त्याच्या परतीसाठी काहीसा विलंब झाला होता. तर या वर्षी मॉन्सूनने २५ सप्टेंबर दरम्यान राजस्थानमधून बाहेर पडण्यास सुरवात केली होती.

तसेच सर्वसाधारण वेळेच्या आधीच अर्ध्या महाराष्ट्रातून मॉन्सून परतला होता. त्यानंतर तीन दिवसांमध्येच म्हणजेच सोमवारी (ता. ९) मॉन्सूनने जवळपास संपूर्ण महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. मॉन्सूनच्या परतीची सर्वसाधारण तारीख पाहता १० ऑक्टोबरपर्यंत तो राज्याच्या बहुतांश भागातून बाहेर पडतो.

महाराष्ट्रासह मॉन्सूनने जम्मू काश्‍मीर, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाना, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांसह महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून निरोप घेतला आहे. तसेच कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, तेलंगण व बिहारच्या काही भागातून मॉन्सून माघारी फिरला आहे.

सध्या मॉन्सूनच्या परतीची सीमा ही रक्सोल, डाल्टनगंज, कंकर ते वेंगुर्लापर्यंत असून परतीची वाटचाल सुरू आहे. दरम्यान लवकरच मॉन्सून संपूर्ण भारतातून बाहेर पडेल, असे ही हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT