Monsoon 
महाराष्ट्र बातम्या

खूशखबर! मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती

नामदेव कुंभार

दिलासादायक वृत्त असून दोन दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवमान विभागने दिली आहे. रत्नागिरीच्या हर्णे येथे शनिवारी मान्सून दाखल झाला आहे. येथून पुढे राज्यात प्रवास सुरु होईल. पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राला मान्सून व्यापून टाकणार आहे. राज्यातील हवामानाची परिस्थिती मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. हर्णेपर्यंत पोहचलेला मान्सून नंतर द.मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत, मराठवाडा काही सलग्न भागात पोहचून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.

तीन तारखेला लक्षद्वीप दक्षिण केरळ आणि दक्षिण तमिळनाडूत सक्रीय झालेला मान्सून काल संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू व्यापून पुढे कर्नाटकच्या संपूर्ण किनारपट्टीसह निम्म्या कर्नाटकात आणि रायलसीमाच्या काही भागात दाखल झाला. केरळनंतर कर्नाटक किनारपट्टीवर कारवारपर्यंत मान्सून पोहोचला होता. त्यानंतर गोव्यासह कर्नाटकचा उर्वरित अंतर्गत भाग व्यापून आंध्रप्रदेश, तेलंगण आणि दक्षिण कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरील काही जिल्ह्यातही मान्सून दाखल झाला आहे.

जुलैच्या मध्यापर्यंत संपूर्ण देश व्यापेल

जूनच्या मध्यापर्यंत मॉन्सूनच्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग व्यापला जाईल. इतकंच नाहीतर हिमालयीय पश्चिम बंगालमध्येही मान्सूनचा पाऊस पडेल. जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशात हजेरी लावेल.

देशात यंदा १०१ टक्के पाऊस

उत्तर-पश्चिम (वायव्य) भारतात आणि दक्षिण द्वीपकल्प येथे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची स्थिती सर्वसाधारण राहणार आहे. भारतात ईशान्य आणि मध्य भागात सामान्यपेक्षा कमी हंगामी पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्यान वर्तविला आहे दरम्यान, हवामान खात्याच्या सुधारित अंदाजनुसार,२०२१ मध्ये देशात मॉन्सून हंगामात (जुन ते सप्टेंबर) सरासरीच्या १०१ % पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रशांत महासागरातील स्थिती जैसे थे (तटस्थ) राहणार असून इंडियन ओशन डायपोल (आयओडी) निगेटिव्ह राहणार असल्याच अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

NDA Success Story: जिद्द, चिकाटी अन् कठोर प्रशिक्षणाचा विजय; पदकविजेत्या छात्रांनी उलगडला तीन वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

Kokan: कोकणात महायुतीत बंडखोरी, शिवसेना आमदाराच्या लेकीचा अर्ज; तटकरेंच नाव घेत थेट सुनावलं

SCROLL FOR NEXT