Monsoon Update southwest monsoon arrives in konkan information from indian meteorological department  
महाराष्ट्र बातम्या

Monsoon: आनंदवार्ता! मॉन्सून कोकणात दाखल - IMD

सकाळ डिजिटल टीम

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज (१० जून) नैऋत्य मॉन्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) माहितीनुसार काही दिवसांच्या उशीराने नैऋत्य मॉन्सून अखेर शुक्रवारी गोव्यात दाखल झाला. शुक्रवारी सकाळपासूनच गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनचा प्रभाव दिसून आला. (Monsoon Update southwest monsoon arrives in konkan information from indian meteorological department)

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी मॉन्सूनने मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात तसेच संपूर्ण गोवा आणि कोकण लगतच्या काही भागात प्रगती केली आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवस या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून यादरम्यान ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान गोवा सरकारने १ जूनपासून खोल समुद्रात मासेमारीवर बंदी घातली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने मच्छिमारांना १४ जूनपर्यंत समुद्रात अजिबात न जाण्याचा सल्ला दिला आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, आता मान्सून उर्वरित महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकणार आहे. त्यामुळे राज्यभर लवकरच पावसाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: मला मारणारा झोंबी आणि वेडा! हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Pune News: पोषण आहारासाठी दिलेल्या वाटाण्याला भुंगे अन् कीड; जुन्नरमधील शाळांमध्ये निकृष्ट धान्याचा धक्कादायक प्रकार

Koyna Dam Power Generation : कोयना धरणातील 25.35 टीएमसी पाणी जातेय वाहून; 176 दशलक्ष युनिट वीजनिर्मितीत घट, लाखो युनिटचा फटका

Marathi News Live Updates : राम मंदिर ट्रस्टचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एअर मार्शल (निवृत्त) जितेंद्र मिश्रा अयोध्येत दाखल

Mukhed Bribe Case: १५ हजारांची लाच अन् एसीबीचा सापळा; मुखेडच्या भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायावर कारवाई, निमतानदारही रडारवर

SCROLL FOR NEXT