MPSC
MPSC Sakal
महाराष्ट्र

MPSC: गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी जाहिरात प्रसिद्ध

सुस्मिता वडतिले

सदर परीक्षा (ता. 26) फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) परिक्षांच्या जाहिराती जाहिर केल्या आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात जारी केली आहे. याद्वारे राज्यकर निरीक्षक 190, पोलिस उपनिरीक्षक 376 आणि सहायक कक्ष अधिकारी पदासाठी भरतीची प्रक्रिया राबवली आहे. सदर परीक्षा (ता. 26) फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम (ता. 19) नोव्हेंबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने भरता येईल.

पूर्व परीक्षेच्या निकालाद्वारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा माहे मे २०२२ किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणा-या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्रता आवश्यक

भारत सरकारने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेत पदवीच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेला बसलेले उमेदवार सुध्दा अर्ज दाखल करु शकतात. परंतु मुख्य परीक्षेपूर्वी त्यांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच पोलिस उपनिरीक्षक पदाकरिता महिला उमेदवारांची उंची 157 सेमी असणे आवश्यक आहे तर पुरुषांची उंची 165 सेमी असणे आवश्यक आहे. तसेच पुरुषांना कमीतकमी पाच सेमी छाती फुगवता आली पाहिजे.

असा आहे पदांचा तपशील

सामान्य प्रशासन विभागातील सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांवर पूर्व परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. वित्त विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदाची 190 जागांवर पूर्व परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. आणि गृह विभागाच्या 376 पदांसाठी पूर्व परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT