MPSC esakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेची तारीख जाहीर; उपजिल्हाधिकारी, सीईओ, बीडीओसह १६ पदांसाठी परीक्षा

संतोष कानडे

मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेनंतर आता विविध १६ संवर्गाच्या मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली असून अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023 असा आहे. तर परीक्षा दि. 20, 21 व 22 जानेवारी 2024 रोजी होतील.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिसूचनेमध्ये म्हटलंय की, दि. ४ जून २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. त्या निकालाच्या आधारे आता संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी ठरलेल्या उमेदवारांची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होईल. अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे जिल्हा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये उपजिल्हाधिकारी या संवर्गाचे ९ पदे आहेत. तर राज्यकर सहकाय्यक आयुक्त १२ पदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी ३६ पदे, सहायक संचालक ४१ पदे, सहायक कामगार आयुक्त १ पद, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ५१ पदे, सहायक आयुक्त २ पदे, सहायक आयुक्त ७ पदे, कक्ष अधिकारी १७ पदे, लोकसेवा आयोगातील कक्ष अधिकारी १ पद, सहकायक गटविकास अधिकारी ५० पदे, मुख्याधिकारी ४८ पदे, उप अधीक्षक भूमि अभिलेख ९ पदे, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ४ पदे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ११ पदे, उद्योग अधिकारी (तांत्रिक) ४ पदे; या पदांसाठी मुख्य परीक्षा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT