MPSC Sakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC : PSI परीक्षेसाठी शारीरिक चाचणीच्या निकषात बदल

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांच्या परीक्षेच्या तारखा तसंच चाचणीचे निकष आणि संधी संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांच्या परीक्षेच्या तारखा तसंच चाचणीचे निकष आणि संधी संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० च्या तारखा जाहीर केल्या आहेत. याशिवाय आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. ती म्हणजे पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ च्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा २२ जानेवारी २०२२ ते १२ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होणार आहे.

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षामध्ये अंतिम निवडीकरीता विचारक्षेत्रात येण्यासाठी शारीरिक चाचणीत किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक राहील. शारीरिक चाचणीचे गुण प्रचलित पध्दतीप्रमाणे अनिवार्य ठेवण्यात आले असून अंतिम निकाल तयार करताना या गुणांचा विचार करण्यात येईल.

सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून, शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल. तसेच या सुधारणा यापुढे प्रसिध्द होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेपासून लागू राहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

शारीरिक चाचणीच्या सुधारित निकषांमध्ये पुरुषांसाठी गोळाफेक वजन ७.२६० किलोग्रॅम यासाठी कमाल १५ गुण तर पुशअप्ससाठी २० गुण असणार आहेत. तर लांब उडीमध्ये १५ गुण आणि १८०० मीटर धावणे यासाठी कमाल ५० गुण अशी एकूण १०० गुणांची चाचणी असेल. महिलांसाठी गोळा फेक वजन ४ किलोग्रॅम, कमाल गुण २० असतील तर २०० मीटर धावणे यासाठी ४० गुण असणार आहेत. याशिवाय ३ किलोमीटर चालणे यासाठी कमाल ४० गुण असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT