ST Employee 
महाराष्ट्र बातम्या

ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; सरसकट 6 हजार रुपयांचा बोनस जाहीर

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरसकट ६ हजार रुपयांच्या बोनसची घोषणा केली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरसकट ६ हजार रुपयांच्या बोनसची घोषणा केली आहे. एकटी कर्मचारी आणि अधिकारी या सर्वांना ६ हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला होता. ( msrtc st employee get 6 thousand divali bonus shinde government announcement)

शिंदे सरकारने मागच्या वर्षीच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये एक हजार रुपयांची वाढ केली आहे. एसटी संघटनांनी यंदा दिवाळीचा बोनस सरसकट १५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र, शिंदे सरकारकडून ही मागणी मान्य झालेली नाही. असे असले तरी बोनसमध्ये वाढ झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांची दिवाळी काही प्रमाणात गोड होणार आहे.

आंदोलनाची हाक

सातवा वेतन आयोग आणि विविध मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनाची हाक दिली होती. त्याला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. मंत्री उदय सामंत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद ठेवून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, की, उदय सामंत कर्मचाऱ्यांशी संपर्कात असून ते यावर तोडगा काढतील. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT