Modi Mumbai Visit esakal
महाराष्ट्र बातम्या

Modi Mumbai Visit : मी जेव्हा मोदींना भेटतो तेव्हा पवित्र भावना... शिंदेंच्याच भाषणाची चर्चा

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुढच्या अडीच वर्षांमध्ये संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल, अशी ग्वाही देत एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा कायापालट करणार असल्याचं म्हटलं आहे. २५ ते ४० वर्षे रस्त्याला खड्डा पडणार नाही अशी रस्ते आम्ही करत आहोत. मात्र काही लोकांना असे रस्ते नको होते, त्यांना विकास नको होता असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तित्वामध्ये काहीतरी खास आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो ना तेव्हा पवित्र भावना जागृत होतात. आजच्या दिवसाची सुरुवात ही सुवर्णाक्षरांनी होणार आहे कारण २०१५ मध्ये मोदींनी याच मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आज पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते लोकार्पण होत आहे.'

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मागच्या सरकारमध्ये काही लोकांची इच्छा होती की, मेट्रोचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होऊ नये. परंतु नियतीला हे मान्य नव्हतं. नियतीने पंतप्रधानांच्याच हस्ते लोकार्पण करण्याची परिस्थिती निर्माण केली. नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोठे प्रोजेक्ट मुंबईकरांसाठी येत आहेत. महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधानांच्याच हस्ते झालं आहे. या महामार्गाच्या रुपाने राज्याला समृद्धी येईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दावोसमध्ये लोक फक्त मोदी..मोदी करत होते- शिंदे

दावोसमध्ये विविध देशातले लोक आले होते. मला अनेक लोक भेटले. काही पंतप्रधान होते काही मंत्री होते. ते फक्त आणि फक्त मोदींबद्दल विचारायचे. एक पंतप्रधान भेटले, मला म्हणाले मी मोदींचा भक्त आहे.माझ्यासोबत त्यांनी फोटो घेतला आणि म्हणाले मोदींना हा फोटो दाखवा. जर्मनी, सौदीचे लोक भेटले ते म्हणाले तुम्ही मोदीजींसोबत आहात ना? मी म्हणाले आम्ही त्यांचेच लोक आहोत. मोदींचा करिष्मा जगभरात पसरला असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT