Mumbai Crime Esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Crime: धक्कादायक! दोन दिवसाच्या नवजात बाळाला रिक्षात सोडलं अन् अपहरणाचा केला बनाव कारण..

मुंबईच्या जुहू गल्ली परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे

सकाळ डिजिटल टीम

मुंबईच्या जुहू गल्ली परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जुहू गल्ली परिसरात राहणाऱ्या एका दांपत्याने आपल्या अवघ्या 2 दिवसाच्या नवजात अर्भकाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली. मात्र जुहू पोलिसांनी अवघ्या काही तासातच तपास करून जे सत्य समोर आणलं आहे, हे सत्य ऐकूनच विश्वास नाही व त्या निर्दयी पालकांविषयी डोक्यात संतापाची लाट नक्कीच उसळेल.

मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑगस्टच्या मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास जुहू गल्ली परिसरात राहणाऱ्या दांपत्याने आपल्या दोन दिवसाच्या बालकाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली.

जुहू पोलिसांनी तपासास सुरुवात केली. तक्रार दिलेल्या दांपत्याच्या शेजाऱ्यांकडे देखील पोलीसांनी चौकशी केली. यात शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेची प्रसूती 29 रोजी राहत्या घरी झाली. तिला एक मुलगा झाला. त्या दिवसानंतर नवजात बालक दिसून आलं नाही म्हणून शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी देखील केली होती.

त्या दोघांची चौकशी करून जे सत्य समोर आलं ते मात्र भयानक होतं. जन्मदात्यांनीच आपल्या नवजात बालकाला सांताक्रुज पश्चिम येथील खिरानगर येथे पार्क केलेल्या रिक्षामध्ये सोडून दिल्याचे कबूल केले.

शोध पथकाने सांताक्रुज पोलिसांना संपर्क साधला असता 30 जुलै रोजी ऑटोरिक्षामध्ये नवजात अर्भक सापडले असल्याचे समजले. यासंदर्भात सांताक्रुज पोलीस ठाणे येथे कलम 317 भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. यानंतर जुहू पोलिसांनी या दांपत्याला सांताक्रुज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

Shocking: दुर्दैवी! चालत्या स्कूल बसची फरशी अचानक तुटली; चिमुकली पडून चाकाखाली आली अन्...; भावासमोरच करूण अंत

Ferry Boat: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू, प्रवासाचा वेळ आणि खर्च किती?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील नियुक्त्या अवैध; पगार वसुलीचे निर्देश, फाइल, आदेश नसलेल्या शिक्षकांवर कारवाई

Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी नाशिक सज्ज! १० हजार स्वयंसेवक आणि होमगार्ड्स सांभाळणार भाविकांच्या सुरक्षेची धुरा

SCROLL FOR NEXT