महाराष्ट्र बातम्या

शिवस्मारकाच्या टेंडरला वाढीव रकमेचे वळण!

सकाळन्यूजनेटवर्क

शापूरजी पालनजी व एल अँड टीच्या निविदांची चौकशी
मुंबई - अरबी समुद्रातील जगविख्यात शिवस्मारकाच्या उभारणीत कंपन्यांनी निविदांमध्ये दिलेल्या वाढीव रकमेमुळे नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे या कंपन्यांनी दिलेल्या रकमा सरकारी अंदाजापेक्षा दीड ते दोनपट असल्याने फेरतपासणी सुरू झाली आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या स्मारकासाठी रिलायन्स, शापूरजी पालनजी व एल अँड टी या तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. यापैकी रिलायन्सची निविदा तांत्रिक कारणामुळे रद्द झाली, तर शापूरजी पालनजी या जगविख्यात कंपनीने 4790 कोटी रुपयांची निविदा भरली. एल अँड टी कंपनीनेदेखील 3826 कोटी रुपयांची निविदा सादर केली; मात्र सरकारने या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 2600 कोटी रुपये इतकी किंमत निश्‍चित केली होती. सरकारची किंमत व कंपन्याची किंमत यामध्ये एवढी मोठी तफावत असल्याने त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही, अशी माहिती देतानाच या दोन्ही किमतीची फेरतपासणी सुरू करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे, असे मेटे यांनी स्पष्ट केले.

शिवस्मारकाचा आराखडा व अंदाजित प्रकल्प किंमत निश्‍चित करताना सरकारी यंत्रणनेने कोणत्या आधारे 2600 कोटी रुपये निश्‍चित केले, तर खासगी विकसक कंपन्यांनी एवढ्या मोठ्या रकमेचा अंदाज करत निविदा टाकताना कोणता आधार घेतला याबाबतची माहिती काढण्यात येत आहे. यामुळे अद्याप निविदा अंतिम करण्यात आलेली नसून तपासणीनंतर किंमत अधिक आहे असे निष्पन्न झाले, तर ई-टेंडरिंग करण्याशिवाय पर्याय नाही, असेही मेटे यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबर किंवा ऑक्‍टोबरच्या सुरवातीला शिवस्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

Pali News : महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

अफगाणिस्तान कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडूकडून निवृत्तीचा धक्कादायक निर्णय; WTC फायनलचाही होता हिस्सा

Ghansangavi Crime : भुतेगाव येथे दूधना नदीपात्रात पोलिसांची कारवाई; आठ टिप्पर तीन जीसीबी जप्त, अकरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT