Samruddhi Highway sakal
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Highway : समृद्धी महामार्ग तब्बल ५ दिवसांसाठी राहणार बंद! कारण...

Chinmay Jagtap

Samruddhi Highway : महारष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा समृद्धी महामार्गा एक दोन नव्हे तर तब्बल ५ दिवस बंद राहणार आहे. यामुळे या मार्गातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे.

जालना इंटरचेंज ते सावंगी मार्गातील टॉवरचे काम सुरू आहे. यामुळे १० ते १२ ऑक्टोबर आणि २५-२६ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते ३.३० या वेळेत महामार्ग वाहतूकीसाठी बंद असल्याचे कळवण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी कि, समृद्धी महामार्गावर १० ते १२ ऑक्टोबर आणि २५-२६ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत कोणतीही वाहतूक होणार नाही. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली आहे.

नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सावंगी इंटरचेंज- जालना महामार्गावरून विरुद्ध - दिशेने निधोना जालना समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे वळविण्यात येणार आहे.तर इंटरचेंज-निधोना एमआयडीसी जालना महामार्गावरून छत्रपती संभाजीनगर केंब्रिज शाळा उजवीकडे वळून सावंगी बायपास सावंगी इंटरचेंजहून शिर्डीच्या दिशेने जाऊ शकतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT