shinde fadanvis govt sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजप - शिंदे गटाचा मनसेकडे ओढा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडल्यानंतर आता भाजप - शिंदे गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन हिंदुत्ववादी मतांचे विभाजन रोखण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मुंबई , ठाणे, औरंगाबाद, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नाशिक महानगरपालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद या महापालिकांवर उद्धव ठाकरे यांच्‍या शिवसेनेची सत्ता काबीज करण्यासाठीच या तीन पक्षाची नवी युती आकारला येत असल्याचे मानले जात आहे. या रणनीतीला आकार देण्यासाठीच सध्या मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याशी भाजप आणि शिंदे गटाच्या भेटीगाठी वाढत असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मुंबई महापालिका हे भाजपचे लक्ष्य आहे. त्यासाठी मनसेच्या सहकार्याची भाजपला गरज आहे.

आराखड्याची तयारी सुरू

मनसेबरोबर निवडणूक पूर्व युती करण्यासाठी भाजपमध्ये सखोल मंथन सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेत मराठी बहुल प्रभागात मनसे आणि शिंदे गटाला झुकते माप द्यावे तर अमराठी बहुल प्रभागात भाजपला मनसे आणि शिंदे गटाने मदत करावी यासाठीचा आराखडा तयार होत असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आणि नवी मुंबईतही शिंदे गट आणि मनसेला प्राधान्य देत सत्ता काबीज करण्याचे डावपेच आखले जात आहेत. नाशिक व पुणे महापालिकेत भाजप आणि मनसे यांना शिंदे गटाचा सहयोग लाभल्यास इथेही भाजप प्रणित हिंदुत्वाच्या विचारांचा झेंडा फडकविण्यात यश मिळेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

मतदारांचा मागोवा

तुर्तास मनसे सोबत थेट युती करण्याच्या मनःस्थितीत भाजप असला तरी याचा परिणाम उत्तर भारतीय मतदारांवर कसा होईल याचाही अंदाज बांधला जात आहे. यासाठी उत्तर भारतीय बहुल प्रभागात हिंदुत्वाच्या समान धाग्यावर या तिन्ही पक्षाने एकत्रपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचे मतदारांमध्ये काय पडसाद उमटतात यासाठीची जोरदार चाचपणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: मोटरबोटवरून पाठलाग, मास्क घालून जहाजावर चढले अन्...; इराणने होर्मुझमध्ये भारतीय जहाज कसे पकडले? पाहा थरारक व्हिडिओ

Video Viral: पाकिस्तानी गोलंदाजाने आज मार खाल्लाच असता... फलंदाजाने बॅट उगारली, दोघांनी अडवले नाहीतर घडला असता अनर्थ...

7th Pay Commission: 'या' कर्मचाऱ्यांची चांदी! ७ व्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा; योगी सरकारकडून पगारवाढीचं मोठं 'गिफ्ट'!

बदमाश पाकिस्तानी ! Mohsin Naqvi ने पत्रकाराला किडनॅप केले? PCB प्रमुखावर गंभीर आरोप, एका Video ने जगभरात खळबळ

State Cooperative Bank Profit: सामाजिक बांधिलकीसह आर्थिक बळकटी; राज्य सहकारी बँकेचा नफा ७०२ कोटींवर, सहकार क्षेत्रासाठी नवा आदर्श

SCROLL FOR NEXT