kirit somaiya esakal
महाराष्ट्र बातम्या

'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते की गुंड, ही तर शरद पवारांची व्यूहरचना'

सकाळ डिजिटल टीम

कऱ्हाड (सातारा) : मी अर्थमंत्रालय, इन्कम टॅक्स चेअरमन, ईडीचे संचालक, सहकार मंत्रालयामध्ये २७०० पेजेसचे पुरावे दिलेत. त्यावर चौकशी सुरु झालीय. मी अधिक माहितीही मागवलीय, ती माहिती दोन दिवसांत मला मिळून जाईल. ईडी आणि संचालक मंडळाकडून यांची चौकशी सुरु असून त्या भीतीनेच राष्ट्रवादीचे गुंड माझ्यावर हल्ला करत आहेत. या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना नक्कीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचा वरदहस्त आहे, त्यामुळे ही व्यूहरचना शरद पवारांचीच (Sharad Pawar) असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी (BJP leader kirit somaiya) केलाय.

गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचा वरदहस्त आहे.

मुश्रीफांविरोधात (Hasan Mushrif) आणखी एक घोटाळा उघडकीस आणू, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यासाठी ते कोल्हापूरला येत असतानाच, कऱ्हाडमध्ये त्यांना पोलिसांनी उतरवलं. कोल्हापूरला जात असताना तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना कऱ्हाडात पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर सोमय्या यांनी कऱ्हाडात आज पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफांसह शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

हसन मुश्रीफ साहेब, 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँड्रिंगचे आले, त्याचा हिशेब अजून का दिला नाही? पवार साहेब ही तुमची व्यूहरचना तर नाही ना?, असा सवाल देखील भाजप नेते सोमय्या यांनी उपस्थित केलाय. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफांनी 100 कोटींचा घोटाळा केला, तर सेनापती घोरपडे कारखाना आणि या कारखान्यात 50 कोटींचे व्यवहार झालेत. हे सरकार शरद पवार चालवत असून याची माहिती त्यांनाच आहे, असंही त्यांनी म्हटलंय. सरकार, हसन मुश्रीफांच्या स्वागतासाठी जनसमुदायाला परवानगी देतं. मग, मला कोल्हापुरात येण्यास परवानगी का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT