Sandeep Deshpande  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sandeep Deshpande : मागच्या सरकारचा मोठा घोटाळा! संदीप देशपांडेंच्या हल्ल्यामागे 'हे' आहे कारण?

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः आज सकाळी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. हा हल्ला नेमका का झाला आणि कुणी केला? याबाबत स्पष्टता नसली तरी हल्ल्यामागचं एक कारण चर्चिलं जात आहे. शिवाय हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय.

संदीप देशपांडे हे मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत होते. त्यांना एकटं पाहून तोंडावर मास्क लावलेले चौघे तिथे आले. त्यांनी संदीप यांच्यावर हल्ला सुरु केला. हातातल्या स्टंपने त्यांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न झाला.

संदीप देशपांडे यांनी प्रतिकार करत आपल्या हातावर मार झेलला. त्यामुळे त्यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचार झाले.

हेही वाचाः बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

संदीप देशपांडे यांनी प्रतिकार करत आपल्या हातावर मार झेलला. त्यामुळे त्यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचार सुरु झाले. मनसेचे वरिष्ठ नेते रुग्णालयामध्ये दाखल झाले होतं.

मागच्या महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात घोटाळा केल्याचा आरोप असून त्यासंदर्भात संदीप देशपांडे हे पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार होते. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. आमदार नितेश राणे यांनी तर विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं स्पष्ट केलंय.

संदीप देशपांडे खरंच कोविड घोटाळा बाहेर काढणार होते का? त्यांच्याकडे पुरावे आहेत का? झालेला हल्ला राजकीय आहे का? या सगळ्या बाजूंनी पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT