Prithviraj Chavan  Esakal
महाराष्ट्र बातम्या

MVA Meeting : नाना पटोलेंच्या अनुपस्थितीत पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा; आगामी विधानसभा निवडणुका...

''महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. मविआला घवघवीत असा पाठिंबा मिळाला आहे. आमचे जरी तीन प्रमुख पक्ष असले तर 30 हुन अधिक संघटना... कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष या सर्वांनी महाराष्ट्रात वातावरण निर्माण करण्यासाठी मोठा वाटा उचलला होता.''

संतोष कानडे

Prithviraj Chavan News : मुंबईतल्या वायबी सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती.

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं म्हटलं आहे. जशा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तशाच आणि त्याच ताकदीने आम्ही विधानसभा लढणार आहोत, असं चव्हाण म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजच्या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे काँग्रेसची 'एकला चलो रे'ची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार, असं बोललं जात असतानाच बैठकीला उपस्थित असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. मविआला घवघवीत असा पाठिंबा मिळाला आहे. आमचे जरी तीन प्रमुख पक्ष असले तर 30 हुन अधिक संघटना... कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष या सर्वांनी महाराष्ट्रात वातावरण निर्माण करण्यासाठी मोठा वाटा उचलला होता.

''बलाढ्य शक्ती विरोधात आम्ही लढलो.. पूर्वी झालं नव्हतं तेवढं यावेळेस मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आलं होतं. यापुढच्या निवडणुकी आम्ही अशाच ताकदीने लढणार आहोत.'' अशी भूमिका चव्हाणांनी स्पष्ट केली.

दुसरीकडे काँग्रेस नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही या बैठकीचं निमंत्रण नव्हतं. त्यांनीच याबाबत स्पष्टता देत, मला बैठकीबद्दल काहीही माहिती नाही असं म्हटलं आहे. एकीकडे नाना पटोले तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी बैठकीला दांडी मारल्याने काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरुय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Pune Birth-Death Records: जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; पुणे महापालिकेला अधिकार, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

RAVINDRA JADEJA: रवींद्र जडेजाचं वनडे करिअर संपणार? 2027 विश्वचषकासाठी डच्चू, अक्षर पटेलला प्राधान्य; अहवालात मोठा दावा

Akkalkot Hannur coordination meet: हन्नूरमध्ये ‘सहविचार सभा’द्वारे चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; प्रशासन-लोकप्रतिनिधींचा अभिनव समन्वय

Pune News : जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्ती त्वरित सुरू करा; उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT