Girish Mahajan esakal
महाराष्ट्र बातम्या

Girish Mahajan : माझा आकडा परफेक्ट असतो, आम्ही लोकसभेला 'आऊट ऑफ 48' जागा जिंकणार; महाजन यांचा दावा

रवींद्र देशमुख

मुंबई - आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपकडून जोरदार तयारी सुरू असून विरोधकांनी देखील इंडिया आघाडी स्थापन केली आहे. मात्र आता गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रात ऑऊटऑफ जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, काँग्रेस किती लढतील आणि किती जिंकतील हे वेळच सांगेल. मी आधीच सांगितलं आम्ही ४८ जागा जिंकणार आहोत. मी सांगितलेला आकडा परफेक्ट असतो. माझ्या सांगण्यात चूक होत नाही. मी पुन्हा सांगेल की, आऊटऑफ ४८, एकही जागा आम्ही हारणार नाही. काँग्रेस सांगते, आम्ही ३२ जागा जिंकेल. मात्र हा मोठा विनोद आहे. वास्तव बोललं पाहिजे. मी कधीही अवास्तव बोलत नाही, असंही महाजन यांनी नमूद केलं.

मराठा आरक्षणाच्या मुद्दावर गिरीश महाजन म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामागे उद्धव ठाकरेच दोषी आहेत. वटहुकूम काढण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना घरातून बाहेर निघाले नसल्याचे म्हणत महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांच्या आंदोलनात झालेल्या प्रकारानंतर विरोधकांनी राजकीय पोळी भाजण्याचे काम केलं असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT