Nana Patole Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole : अमित शाहांच्या समोरच अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सरकारचे कान टोचले; नाना पटोले म्हणाले...

संतोष कानडे

नागपूरः नागपूर येथे आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची उपस्थिती आहे.

यावेळी बोलतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेटपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकारला धारेवर धरलं. नागपूरची सभा होऊ नये यासाठी ईडी सरकारने अनेक कुरपती केल्या परंतु कोर्टाच्या हस्तक्षेपाने सभा झाली, असं ते म्हणाले.

पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले की, आज वंदनीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. परंतु अप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच सरकारचे कान तिथेच टोचले.

यासंदर्भात बोलतांना नाना पटोले म्हणाले की, अप्पासाहेब धर्माधिकारी बोलतांना मनुष्य ही जात आणि मानवता ही धर्म असल्याचं म्हटले. भाजपला हे शिकण्याची गरज असल्याचं पटोलेंनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले नाना पोटोले?

  • सभा होऊ नये यासाठी ईडी सरकारकडून कुरापती केल्या जात आहेत

  • नागपूरमध्ये सभा होऊ नये, यासाठीही जागेचा वाद भाजपने निर्माण केला

  • परंतु कोर्टाच्या हस्तक्षेपाने सभेला परवानगी मिळाली

  • नागपूरकरांना लुटलं जात आहे. देशातलं सगळ्याच महागडं शहर

  • मागील एक महिनयापासून शेतकऱ्याला एक रुपयाही दिलेला नाही

  • राज्य सरकारला देणंघेणं नाही

  • मनुष्य ही जात आहे आणि मानवता हा धर्म आहे

  • अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सरकारचे कान तिथेच टोचले आहे

  • जे सरकार चांगलं काम करतं त्याला जाहिराती कराव्या लागत नाही

  • हजारो कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले जात आहेत. पण जनतेला रुपया मिळत नाही

  • मलिक यांनी भाजप सरकारचा भांडाफोड केला आहे

  • तिनशे किलोचे स्फोटकं नागपूरमधून गेले

  • ते कुणी पाठवले, कसे पाठवले, याची चौकशी झाली पाहिजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

SCROLL FOR NEXT