Winter Session 2022 esakal
महाराष्ट्र बातम्या

Winter Session 2022 : ये AU, AU कौन हैं... सत्ताधाऱ्यांचं पोलखोल आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

नागपूरः दिशा सालियान प्रकरणामध्ये सत्ताधारी गटाकडून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं जात आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करुन आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही झाली आहे.

यातच आज शिंदे गटाचे नेते आणि भाजपच्या नेत्यांनी 'ये AU..AU.. कौन हैं' असं म्हणत बॅनरबाजी करुन जौरदार घोषणाबाजी केली.

''सी.बी.आय. च्या रिपोर्टप्रमाणे हे नाव अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात बाहेर आलं आहे. हा ‘AU’ म्हणजे नक्की कोण ? AU ला छडा लागलाच पाहिजे, मग तो कोणीही असो. आपल्या ताकदीचा खूप चुकीचा वापर काहींनी केला आहे आणि तो कोण हे जनतेसमोर यायलाच हवं...'' असं प्रताप सरनाईक म्हणालेत.

हेही वाचाः सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियान आणि इतरांच्या फोनवर आदित्य ठाकरेंच्या नावानं फोन आल्याचा दावा त्यांनी बिहार पोलिसांच्या हवाल्यानं केला आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाबाबत सूचक विधान केलं आहे.

लोकसभेत बुधवारी नियम १९३ अतंर्गत ड्रग्ज संदर्भात लघू चर्चा पार पडली. या विषयावर बोलताना शिंदे गटाचे खासदार आणि गटनेते राहुल शेवाळे यांनी म्हटलं की AUचा विषय खूपच गंभीर आहे. AUचा अर्थ 'अनन्या उद्धव' असं नाही तर आदित्य उद्धव ठाकरे असंही बिहार पोलिसांनी म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांचा तपास वेगळा, बिहार पोलिसांचा तपास वेगळा तसेच सीबीआयचा तपास वेगळा आहे. त्यामुळं लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत, असं शेवाळे म्हणाले. त्यानंतर आता राज्यामध्ये खळबळ उडाली असून हिवाळी अधिवेशनात वातावरण तापलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kevin Pietersen: वर्ल्ड कपआधी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! १२ वर्षांनंतर पीटरसनला दिली संघात एन्ट्री; पण नेमकी भूमिका काय?

Phulambri News : काँग्रेसच्या गांधी भवनात सत्तारांची अचानक ‘एन्ट्री’..! भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराला ICC कडून शिक्षा! शफाली वर्माला सेंडऑफ देणं पडलं महागात

अशोक सराफ की निवेदिता सराफ? भांडण झालं तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? अभिनेत्री म्हणाल्या- आम्ही...

Mangalwedha News : धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी ठोस कारवाई करा; धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

SCROLL FOR NEXT