Nana Patole nana patole
महाराष्ट्र बातम्या

चंद्रकांत पाटलांच्या इशाऱ्याला काँग्रेस घाबरत नाही - पटोले

काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे उघड करणार असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

सुधीर काकडे

राज्यात सध्या किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर आरोप करण्याची मालिका सुरु केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमधील इतर काही नेते सुद्धा भाजपच्या रडारवर असल्याचे समजते आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यानंतर काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे उघड करणार असल्याचा इशारा दिला. यावर प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्याला घाबरत नसल्याचे सांगितले.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भाजपने घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सध्या हसन मुश्रीफ यांच्या कथित घोटाळ्यांवरुन त्यांच्याविरुद्ध ईडीकडे तक्रार दाखल असल्याचे सांगितले आहे. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांनी देखील काँग्रेसला इशारा दिला. त्यावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रसला प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रात ब्लॅकमेलींग करणारे सरकार असल्याचा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केला. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्याला काँग्रेस घाबरत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांमुळे आता राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार असल्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT