नारायण राणे, उद्धव ठाकरे google
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरेंना अटक करा, भाजप समर्थकांची मागणी

नामदेव कुंभार

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यात मंगळवारी अभूतपूर्व राडा झाला. एकीकडे शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते रस्त्यांवर परस्परांना भिडले असताना राज्य सरकारने राणेंना अटक केली. या घटनेचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत पडसाद उमटले. भाजपने राणेंच्या वक्तव्याचे समर्थन केले नसलेतरीसुद्धा त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. ज्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान हे महाभारत घडले ती यात्रा सुरूच ठेवण्यात येईल, असे भाजपकडून सांगण्यात आले. राणे यांना अटक केल्यानंतर भाजप समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाना साधला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंना अटक करा, अशी मागणी भाजपच्या समर्थकांनी केली आहे. सोशल मीडियावर #ArrestUddhavThackrey असा ट्रेंड सोशल मीडियावर होत आहे. समर्थकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. काहींनी प्रसारमाध्यमांचे दाखले देत उद्धव ठाकरे यांना अटक करा, अशी मागणी केली आहे.

मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर आक्षेप घेतला होता. उद्धव ठाकरे दसऱ्याला जे बोलताता ती ठाकरे शैली आहे.‘तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना निर्लज्ज म्हणता. मंत्र्यांना लाथा घाला म्हणता, चौकीदार चोर है म्हणता. त्यावर गुन्हे दाखल का होत नाहीत? शार्जिल इस्मानी याच्यावर का कारवाई केली नाही? युवा सेनेचे कार्यक्रम चालतात. मात्र आमच्या जनादेश यात्रेवर ४० गुन्हे दाखल करता. अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही,’’ असे फडणवीस म्हणाले.

सोशल मीडियावर भाजप कार्यकर्ते काय म्हणाले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT