Narayan Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

"उंदीर न मारलेले कोथळा काय काढणार?" नेमकं काय म्हणाले राणे?

विनायक होगाडे

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये रोष पहायला मिळाला. काल ठिकठिकाणी राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत असलेल्या राणेंना संध्याकाळी रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. काल उशीरा रात्री महाड कोर्टाने जामिन मंजूर केल्यानंतर आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भुमिका मांडली आहे. राणेंनी या पत्रकार परिषदेत नेहमीप्रमाणे शिवसेनेवर टीका केली आहे.

आयुष्यात उंदीर न मारलेले कोथळा काय काढणार? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी याआधी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा पाढा वाचला. तसेच त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख करत हे संस्कार असतात का, अशी व्यक्ती मुख्यमंत्री पदी बसवणे शोभतं का? असा टोमणाही मारला. मला अटक नव्हे, तर पोलिसांच्या विनंतीवरुन मी कोर्टात गेलो. दोन्ही कोर्टांमध्ये माझ्याबाजूने निकाल दिलाय. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आहेत की अनिल परब असा सवाल करत परबांविरोधात खटला दाखल करु, असंही त्यांनी म्हटलंय. शिवाय, संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी म्हणून फक्त सामनामध्ये लिहतात. बाकी काही त्यांची पात्रता नाही, असंही त्यांनी म्हटलयं. कोर्टाच्या बंधनामुळे सध्या 'तो' शब्द उच्चारणार नाही. मात्र, १७ तारखेनंतर सडेतोड उत्तर देऊ. आता खंडीत झालेली जनआशीर्वाद यात्रा पुन्हा दोन दिवसांनी सिंधूदूर्गमधून सुरु होईल, असंही त्यांनी म्हटलंय.

पत्रकार परिषदेत काय म्हणाले राणे?

  • माझ्या चांगुलपणाचा फायदा पत्रकार घेतात.

  • उद्धव ठाकरे खूश व्हावेत, त्यासाठीच संजय राऊत 'सामना'मध्ये लिहतात. त्यांना मी १७ तारखेनंतर उत्तर देईन.

  • मला अटक केली नव्हती, मी पोलिसांच्या विनंतीवरुन कोर्टात गेलो होतो.

  • काही चॅनेल पाहतोय आम्ही. लोकांची बाजू घेणं हे घटनेमध्ये पत्रकारांचं कर्तव्य सांगितलंय. ते पत्रकारांनी करायला हवं. म्हणून आज पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी कोर्टाचा निर्णय आलाय, पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला. कोर्टाने म्हटलंय, राज्य सरकार कसलीही कारवाई करणार नाही. कायदेशीर कारवाईपासून राणेंना संरक्षण असं म्हटलंय.

  • राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून बोललो.

  • माझ्या भारत देशाचा मला अभिमान आहे. म्हणून भारत देशाचा स्वातंत्र्यदिन ज्याला माहित नाही, त्यांनी चेष्टा करावी, म्हणून मला ते वाक्य तोंडात आलं. मी भारताबद्दल काहीही बोललेलं ऐकून घेणार नाही. म्हणून मी माझी बाजू मांडली आहे. पुढच्या वेळी पासून मी टेप देखील सोबत ठेवणार आहे. कारण वाक्यांचा विपर्यास केला जातो. तो होऊ नये म्हणून इथून पुढे काळजी घेईन.

  • आमची जनआशीर्वाद यात्रा सुरुच राहिल. महाराष्ट्र एक प्रगत राज्य कुठे अधोगतीकडे चाललंय. कोरोनामध्ये देशात जेवढे मृत्यू झाले त्यातले एक तृतीयांश मृत्यू महाराष्ट्रात. यात कसला पराक्रम आहे?

  • राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे कुठे?

  • तुम्ही कुणी माझं काही करु शकत नाही. मी तुम्हा सगळ्यांना पुरुन उरलोय. शिवसेना माझ्यामुळेच वाढलीय. तेंव्हा अपशब्द वापरणारं कुणी नव्हतं. ज्यांना आमचा बंदोबस्त करायचा त्यांनी करु दे. मी घाबरत नाही.

  • पवार साहेब, काय भाषा आहे ही?

  • मुख्यमंत्र्यांनी अमित शहांबद्दल देखील निर्लज्ज हा शब्द उच्चारला होता.

  • सेनाभवन बद्दल असं कोण करेल, त्याचं थोबाड फोडा, असं मुख्यमंत्र्यांनीही आधी म्हटलंय. त्यांच्यावर कारवाई का करु नये? दुसरं एक वाक्य आहे योगी साहेबांबद्दल. हा योगी आहे का ढोंगी? चप्पलाने मारलं पाहिजे. असं एका मुख्यमंत्र्यांना म्हटलंय. पवार साहेब हे संस्कार आहेत का?

  • केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मोदींनी सांगितल्याप्रमाणे जनआशीर्वाद यात्रा काढली. दोन दिवसांनंतर पुन्हा ही यात्र सुरु करण्यात येईल. मोदींनी सामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जनआशीर्वाद यात्रा सुरु असताना काही विरोधकांनी लढा सुरु केला. मात्र माझा भाजप पक्ष माझ्या पाठिशी उभा राहिला. मी सर्वांचेच आभार मानतो.

  • काल मी रत्नागिरिहून महाड कोर्टात जाऊन रात्रीहून सकाळी पाच वाजता मुंबईत पोचलो

  • महाड कोर्ट आणि मुंबई हायकोर्ट, दोन्ही कोर्टात निकाल माझ्याबाजूने लागलेत. याचा अर्थ देश कायद्याने चालतोय हे सिद्ध झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: विराट कोहलीचा चौकार अन् मोडला राहुल द्रविडच्या नावावरील मोठा विक्रम! इंग्लंडमध्येही ठरला 'किंग'

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी कायम

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT