Sharad Pawar CM Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

''नरेंद्र मोदी अन् शरद पवार चांगले मित्र, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी दोघांनी...'' शिंदे गटाची प्रतिक्रिया चर्चेत

संतोष कानडे

मुंबईः अजित पवार गटाने शरद पवारांची आज पुन्हा भेट घेतली असून या भेटीत शरद पवारांना एकत्रित काम करण्यासंदर्भात मनधरणी केली. मात्र शरद पवारांनी अद्याप मौन बाळगलेलं आहे. राष्ट्रवादीतल्या या नाट्यमय घडामोडींवर शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, शरद पवार जेष्ठ नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमदार गेले असतील तर त्यात वाईट काय आहे. राष्ट्रवादीचं मनोमिलन व्हावं ही आमची इच्छा आहे. मोदी साहेब आणि पवार साहेब चांगले मित्र आहेत, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी दोघांनी एकत्र यावे ही इच्छा असल्याचं केसरकर म्हणाले.

काल अचानक अजित पवार गटाचे मंत्री आणि काही नेते शरद पवारांच्या भेटीसाठी वायबी सेंटरमध्ये पोहोचले होते. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना सोबत काम करण्याची विनंती केल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर जयंत पाटील यांनीही फुटीर गटाने दिलगिरी व्यक्त केल्याचं सांगून ते पक्षात परत आले तर आनंदच होईल, अशी भूमिका मांडली.

मात्र पवार काहीही बोलले नव्हते. त्यानंतर झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात शरद पवारांनी पुरोगामी विचारांसोबत पुढे जाण्यासंदर्भात भाष्य केलं. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय सुरुय, हे अद्याप स्पष्ट होत नाहीये.

आज पुन्हा अजित पवार गटाच्या आमदार, नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. काल काही आमदार मतदारसंघात होते, त्यामुळे शरद पवारांचे आशीर्वाद घेता आले नव्हते. आज त्यांनी आशीर्वाद घेतले. पवार साहेबांना पुन्हा सोबत काम करण्यासंबंधी विनंती केल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT