Chandrashekhar Bawankule And Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Narendra Modi : ''त्यांना टीका झोंबली आहे झोंबू द्या'', भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची पवारांवर टीका

संतोष कानडे

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. स्वतः शरद पवार यांनी मोदींना जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिलीय.

शिर्डी येथील कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, २००४ ते २०१४ या काळा देशाच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे होती. २००४ ला देशात अन्नधान्याची टंचाई होती. शपथ घेतल्यानंतर मी कटू निर्णय घेतला तो म्हणजे अमेरीकेतीला गव्हाचा आयात करण्याचा, असं सांगत पवारांनी घेतलेल्या निर्णयांचा पाढाच वाचला.

त्यानंतर पवारांना उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विशिष्ट विषयासंदर्भात टीका केली होती. शरद पवारांना आणखी काही गोष्टी करता आल्या असत्या, पण त्यांनी त्या केल्या नाहीत. त्यांना ही टीका झोंबली आहे.. झोंबू द्या, जनतेला सगळं माहिती आहे. त्या सभेला एक लाखांपेक्षा जास्त लोक होते, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, फडणवीस यांनीही पवारांना उत्तर दिलं आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली ३०५ खासदार निवडून येतात त्यांनी ४ खासदार असणाऱ्यांचा धसका घेतला, असं म्हणणं हास्यास्पद आहे, अशी टीका फडणवीसांनी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT