PM Modi Solapur Visit 
महाराष्ट्र बातम्या

PM Modi Solapur Visit: मला ही अशा घरी राहायला मिळालं असतं तर... कामगारांच्या घराचं उद्घाटन करताना मोदींच्या डोळ्यात अश्रू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. ९० हजार घराचे लोकार्पण करण्यात आले.

Sandip Kapde

PM Modi Solapur Visit:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. ९० हजार घराचे लोकार्पण करण्यात आले. ३० हजार डेमो फ्लॅटची पाहणी करण्यात आली. तसेत १० लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. अमृत योजनेतून १७०० कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी मोदींनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत बोलत पंढरपुरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर यांना नमस्कार केला. मोदी म्हणाले, राम २२ जानेवारीला आपल्या घरात आगमन होणार आहे. संतांच्या मार्गदर्शनानुसार मी विशेष व्रत करत आहे. माझ्या या व्रताची सुरुनात नाशिक येथून झाली. रामभक्तीच्या वातावरणात आज १ लाखपेक्षा जास्त कुटुंबाचा गृहप्रवेश होत आहे. मला खूप आनंद होत आहे. मला आनंद आहे की हे कुटुंब आपल्या पक्या घरात राम ज्योती प्रज्वलित करणार आहेत.

सोलापुरातील कामगारांना घरं मिळालं, मला आनंद झाला आहे. महाराष्ट्रातील लोकांमुळे महाराष्ट्राचा विकास झाल्याचे मोदी म्हणाले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, मला वाटते की मलाही अशा घरात राहण्याची संधी मिळाली असती तर...ह्या गोष्टी मी पाहतोय मला खूप आनंद होतो. एवढ्या लोकांचे स्वप्न पूर्ण होत आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले माझं आणि सोलापुरचं जून नातं आहे. हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, चिंधी वेचणारे, विडी कामगार, चालक अशा लाभार्थ्यांना पीएमएवाय-अर्बन योजनेंतर्गत तयार केलेल्या घरांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, 'राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी मी काही संतांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या नियमांमध्ये व्यस्त आहे आणि मी त्यांचे काटेकोरपणे पालनही करतो. महाराष्ट्रातील नाशिक येथील पंचवटीच्या भूमीतून त्याची सुरुवात झाली हाही योगायोगच म्हणावा लागेल. आज या रामभक्तीच्या वातावरणात महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक कुटुंब त्यांच्या घरात जाणार आहेत. महाराष्ट्रातील ही एक लाखाहून अधिक कुटुंबे २२ जानेवारी रोजी संध्याकाळी त्यांच्या कायमस्वरूपी घरांमध्ये रामज्योती प्रज्वलित करतील. (Latest Marathi News)

२२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या सोहळ्याबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले, "हा काळ आपल्या सर्वांसाठी भक्तीचा आहे. तो ऐतिहासिक क्षण २२ जानेवारीला येणार आहे, जेव्हा आपले प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. मंदिरात आपल्या मूर्तीचे दर्शन घेण्याचे अनेक दशकांचे दुःख आता दूर होणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : एमपीएससीचे विद्यार्थी चर्चेला तयार- सुप्रिया सुळे

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

Miami Airport Plane Crash : ॲमेझॉनचं विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरलं अ्न रस्त्यावर आलं, वाहनांना धडक; ५ जणांचा मृत्यू

पुन्हा पुन्हा तेच चेहरे पाहून कंटाळली तापसी पन्नू? बॉलीवूडच्या कास्टिंगवर तापसी पन्नूची टीका करत म्हणाली, 'रोमँटिक कॉमेडीत तेच...'

SCROLL FOR NEXT