Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

''जेव्हा भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माळा घालून सभागृहात आले होते...'' शरद पवारांनी सांगितला तेरा वर्षांपूर्वीचा किस्सा

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीविरोधात नाशिकच्या चांदवड येथे शरद पवारांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

संतोष कानडे

नाशिकः केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीविरोधात नाशिकच्या चांदवड येथे शरद पवारांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी शरद पवारांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढत तेरा वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

रास्ता रोको आंदोलनादरम्यान बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद झालेली आहे. सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतलेला असला तरी त्यांना तो निर्णय मागेच घ्यावा लागेल. जोपर्यंत सरकार निर्णय माघारी घेत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.

शरद पवार पुढे म्हणाले, केंद्र सरकार आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांची काळजी नसेल तर शेतकरी उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही.. २००९-२०१० मध्ये लोकसभेत भाजपच्या लोकांनी कांद्याच्या किंमती वाढल्या म्हणून गोंधळ घातला होता. भाजपचे लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून सभागृहात आले. त्यांनी कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी केली होती.

शरद पवार पुढे म्हणाले, लोकसभा अध्यक्षांनी मला सरकारच्या धोरणाबद्दल विचारलं. मी उत्तर दिलं, कांदा पिकवणारा शेतकरी लहान शेतकरी आहे. थोड्याश्या किंमती वाढल्या तर एवढा दंगा करण्याची गरज नाही. तुमच्या सबंध ताटामध्ये कांद्याचा खर्च किती? यावर काहीही उत्तर आलं नाही. मी निर्णय घेतला कांद्याची किंमत कमी होणार नाही आणि निर्यातबंदी होणार नाही. कुणी म्हणत असेल कांदा महाग झाला तर त्याने तो खाऊ नये.

शरद पवार म्हणाले, सध्या केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतऱ्यांना उध्वस्त करणारा आहे. ही बंदी उठवलीच पाहिजे. आम्हाला रस्त्यावर बसण्याची हौस नाही. लोकांना त्रास द्यावा वाटत नाही. परंतु असं केल्याशिवाय दिल्लीला जाग येत नाही. चांदवडच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर सरकारकडून असं करु, तसं करु सांगितलं जात आहे. याच्यापूर्वी कुणी काहीही बोलत नव्हतं. असं म्हणत शरद पवारांनी निर्णय मागे घेण्याचं आवाहन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT