Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांची मोठी खेळी! विधानसभेचे मैदान मारण्यासाठी प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकाराची नेमणूक

Ajit Pawar appoint Naresh Arora as strategist: लोकसभेसारखी विधानसभेमध्ये पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अजित पवारांनी एका नव्या रणनीतीकाराची नेमणूक केली आहे. विधानसभेला चांगले यश मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय.

कार्तिक पुजारी

मुंबई: लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले होते. आता विधानसभा काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने अजित पवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभेसारखी विधानसभेमध्ये पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अजित पवारांनी एका नव्या रणनीतीकाराची नेमणूक केली आहे. विधानसभेला चांगले यश मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अजित पवार गटाने नरेश अरोरा यांची निवडणूक रणनीतीकार म्हणून नेमणूक केली आहे. अरोरा हे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीला उपस्थित होते. विधानसभेसाठी अजित पवार गटाने मोठी खेळी खेळल्याचं बोललं जातंय. याआधी नरेश अरोरा यांनी अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचे काम पाहिले आहे. निवडणूक रणनीतीमध्ये त्यांचा हातखंडा आहे.

कोण आहेत नरेश अरोरा?

नरेश अरोरा हे पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनीचे संस्थापक आहेत. याआधी त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन केले आहे. राजस्थान, कर्नाटकसह इतर काही राज्यांत त्यांनी काँग्रेसच्या प्रचार व्यवस्थापनाचं काम पाहिलं आहे. त्यांच्या या क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव पाहता अजित पवार गटाने निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांना निवडलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नरेश अरोरा यांनी विधानसभेसाठी त्यांची ब्रँडिग आणि रणनीती अजित पवार गटासमोर मांडली आहे. पक्षाला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ९० दिवसांचा प्लॅन तयार केला आहे. अजित पवारांनी बजेटमध्ये केलेल्या मोठ्या घोषणांवर जास्त लक्ष दिले जाणार आहे. बजेटमधील घोषणांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

अजित पवार यांची प्रतिमा उंचावण्याचं काम केलं जाणार आहे. त्यांचे प्रशासकीय कौशल्य, विश्वसनीयता, आश्वासन पूर्ण करण्याची धमक या गोष्टींवर जास्त लक्ष दिले जाईल. विरोधकांच्या खोट्या दृष्टीकोनाला बळी न पडता विकासकामांचा प्रचार करण्यास नेत्यांना सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

प्रभुकुंज ते दुबईचे रेस्टॉरंट! आशा ताईंच्या निधनानंतर त्यांच्या अफाट मालमत्तेचा मालक कोण? त्यांच्या मृत्युपत्रानुसार...

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला 'या' शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करा; आयुष्यात येईल अखंड समृद्धी

हा मुलगा खरंच १४ वर्षांचा आहे? ललित मोदीचं Vaibhav Sooryavanshi बाबत खळबळजनक विधान; म्हणाले, माझा मुलगा या वयाचा आहे...

SCROLL FOR NEXT