Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : ''9 महिन्यात तर बाळ जन्माला येतं, यांना साधा मंत्रिमंडळ विस्तार करता येईना"

आधी तर दोघेच टिकोजी राव होते, असं कुठं सरकार चालत का?

सकाळ डिजिटल टीम

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार हा सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून सातत्याने चर्चेत येणारा विषय आहे. शतच विरोधक सत्ताधाऱ्यांवर मंत्रिमंडळ विस्तारावरून वारंवार टीका करताना दिसून येतात. यावर सत्ताधारी कायमच उत्तरे देत असतात. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोलताना लहान बालकाच्या जन्मालाही इतका वेळ लागत नाही म्हणत मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केली आहे.

राज्यातील सरकारला सात महिने झाले तरी मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. राज्यात कर्तृत्वान महिला नाहीत का? 20 लोक मंत्रिमंडळात आहेत. त्यात एखादी महिला मंत्री केली असती तर काही बिघडले असते का? फक्त म्हणता महिलांना संधी देऊ. पण कधी देणार? असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना करत 7 महिने झाले, 9 महिन्यात तर बाळ जन्माला येतं. यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही, अशी खोचक टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

आधी तर दोघेच टिकोजी राव होते, असं कुठं सरकार चालत का? असंही अजित पवार म्हणाले आहेत. हिंगोलीमधील सभेवेळी बोलताना अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे. गेल्या सात महिन्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. सगळ्यांना सांगितले जाते तुम्हाला मंत्री करतो. तुम्हाला मंत्री करतो. ते म्हणतात कधी ? त्यांच्या घरच्यांनी सूट शिवले. फार गळा आवळायची वेळ आली पण मंत्रीपद काही मिळेना, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचाच खासदार झाला पाहिजेत. 50 खोके आणि त्यांना एकदम ओके करा, असं आवाहनही अजित पवारांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT