महाराष्ट्र बातम्या

निवडणुका जवळ आल्याने शिवसेनेला जनतेचा पुळका : रोहित पवार

उत्तम कुटे

पिंपरी : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या अडचणींचा शिवसेनेला अचानक आलेल्या कळवळ्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला. जनतेचा हा पुळका म्हणजे बहुतेक निवडणुका जवळ आली वाटतं, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

शेतकऱ्यांचा राग शमविला नाही, तर सत्तेची आसने जळून खाक होतील, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर रोहित यांनी आपल्या फेसबुकपेजवर उपरोधिक टिपण्णी केली आहे. तर, काल शिवसेना मंत्री, आमदार शेतात हवे अशी तंबीच ठाकरेंनी दिली आहे. ही विधाने पाहता बहुतेक निवडणूक जवळ आली वाटतं, अशी चर्चा लोकांत सुरु झाल्याचे रोहित यांनी म्हटलं आहे. पावसाचा अंदाज लावण्यासाठी ज्याप्रकारे लोकांचं वेधशाळेकडे लक्ष असतं. त्याप्रमाणे जर निवडणुकांच्या तारखांचा अंदाज लावायचा असेल तर शिवसेनेच्या विधानांकडे लक्ष ठेवा. मात्र, हा जनतेच्या अडचणींचा कळवळा नसून, हा आलेला पुळका निवडणूका जवळ आल्याने आला आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

तसेच ते पुढे म्हणाले, केंद्र व राज्यातही सत्तेत असलेल्या शिवसेनेला या अडचणी गेल्या पाच वर्षात समजल्या नाहीत का? आताच कशा समजल्या अशी नेमकी विचारणाही त्यांनी केली आहे. पण 'ये पब्लिक है, सब कुछ जानती है', असा टोला त्यांनी लगावला. निवडणुकीच्या वाटाघाटीत मागे पडली की सहकारी पक्षांवर शिवसेना टीका करते, तसा अनुभव आहे. तेच कारण या पुळक्यामागे आहे, असे रोहित यांचं म्हणणं आहे.

शिवसेनेचे हे वागणं म्हणजे आपल्याकडे जेवणाला पाहुण्यांना बोलवायचं आणि जेवणात मीठ कमी पडलं म्हणून जेवणाला दोष देत गोंधळ घालण्यासारखं आहे, असे त्यांनी सांगितले. 

युतीत जागावाटपात शिवसेना अपयशी ठरते आहे का? त्यांनी मागितलेलं उपमुख्यमंत्रिपद भाजपने नाकारले आहे का? यावेळीही कमी जागेवर त्यांची बोळवण होणार का? असे प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहेत, असा नेमका शेवट त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT