Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या आमदाराचा नाना पटोले, संजय राऊतांना इशारा म्हणाले, 'आमची भूमिका...'

कोणी कोणाच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात लक्ष द्यावे, असा टोला लगावला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरू असल्याचंही म्हटलं आहे.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे.

अमोल मिटकरी बोलताना म्हणाले की, 'कोणी कोणाच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात लक्ष घालावे. तर शरद पवार राज्यभर फिरले म्हणुनच 2019 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या. काँग्रेसचे आमदार बोलतात पवार साहेब आले म्हणुन आम्ही आमदार झालोय. राष्ट्रवादीत काय सुरू आहे हा आमचा प्रश्न आहे' असं मिटकरी म्हणाले आहेत.

काँग्रेसने त्यात लक्ष घालू नये त्यांनी चिंतन करावं, अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी केली. राष्ट्रवादीत काय सुरू आहे, यामध्ये संजय राऊत आणि काँग्रेसने लक्ष घालू नये, त्यांची त्यांचं दुकान पहावं. आमची भुमिका स्पष्ट आहे. आम्ही भाजपा विरुद्ध लढणार आहोत. महाविकास आघाडी म्हणुन लढणार आहोत. माझ्या पक्षात पातळी सोडून कोणी बोलत नाही. आमच्यामुळे महाविकास आघाडीत कुठेही फुट पडणार नाही. प्रत्येक पक्षाने आचार संहिता पाळावी, असंही मिटकरी पुढे म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी बरोबरी करू शकत नाही, विक्रम मोडणं दूरच''; सरन्यायाधीशांनी कुणाचं केलं कौतुक?

"राम आणि रावण समोर येणार नाहीत !" रामायण विषयी यशचा मोठा खुलासा; म्हणाला...

Latest Marathi News Live Update: जालन्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

Woman Love Relationship : सैराटपेक्षाही धक्कादायक! पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय, घरच्यांनी विष पाजलं; मृतदेह जाळला अन्, कर्नाटक -महाराष्ट्र कनेक्शन

Solapur Sugar Mills : साेलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांना प्रशासनाचे अभय; चारशे कोटींहून अधिक थकीत, मोजक्याच कारखान्यांवर कारवाई!

SCROLL FOR NEXT