APMC Election 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

APMC Election 2023: प्रतिष्ठेच्या लढाईत विखे पाटीलांना मोठा धक्का; राहुरी बाजार समितीत पुन्हा तनपुरेंची सत्ता

रुपेश नामदास

राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच पार पडली. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल आज (शनिवारी) जाहीर होणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या राहुरी कृषी उत्पन्ना बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे, भाजप खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले आणि यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.

अखेर या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या पॅनेलने भाजप पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवत भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला आहे.

त्यामुळे राहुरी बाजार समितीत पुन्हा तनपूरेंचीच सत्ता आली आहे. या निवडणुकीत तनपुरे गटाचा दणदणीत विजय झालाय. तनपुरे गटाने 18 पैकी तब्बल 16 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवत राहुरी बाजार समितीवर 20 वर्षांपासूनची एकहाती सत्ता कायम ठेवली आहे.

या निवडणुकीत विखे-कर्डिले गटातील सोसायटी मतदारसंघातून दोन सदस्य निवडून आले आहेत. या निवडणुकीत विखे पाटलांनी तनपुरेंना आव्हान दिलं होतं. मात्र नवख्या प्राजक्त तनपुरे यांनी विखे-कर्डिले गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Legislative Council election : पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड; सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Monsoon Update News : आनंदवार्ता ! मॉन्सूनची केरळनंतर कर्नाटकात हजेरी, महाराष्ट्रात 'या' दिवशी दाखल होणार; हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

कमळीच्या आनंदावर पडणार विरजण! आजोबांच्या मृत्यूचं सत्य अखेर समोर; प्रोमो पाहून प्रेक्षकही दुःखी

Pune Lonavala Railway: 'पुणे-लोणावळा रेल्वेमार्ग फुल्ल!' ८८% क्षमतेने धावणाऱ्या मार्गावर नव्या लोकल फेऱ्यांना ब्रेक, रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT