NCP officials from Parbhani district will join Shiv Sena in the presence of CM Eknath Shinde in Mumbai  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : राष्ट्रवादीला परभणीत मोठा धक्का! १२ जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत करणार प्रवेश

रोहित कणसे

राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणूकांच्या तयारीने जोर पकडाला आहे, यादरम्यान अमरावती येथे शिवसेनेने राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. परभणी जिल्ह्यातील १२ जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार, बाजारा समितीचे संचालक, पंचायत समितीचे माजी सभापती यांच्यासह अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

हे सगळे पदाधिकारी परभणीकडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळ पार पडणार आहे. पदाधिकाऱ्यांच्या गळतीने राष्ट्रवादीला परभणीत मोठं खिंडार पडणार आहे.

मागील काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इतर पक्षातून होणारं इन्कमींग वाढल्याचं दिसत आहे.यादरम्यान आज आजवरचा सर्वात मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण पक्षप्रवेश करणार?

जवळपास १२ विद्यामान जिल्हा परिषद सदस्य हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. यामध्ये चार सदस्य हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांचे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार, गोदावरी सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी अध्यक्ष यासोबतच पंचायत समितीचे संचालक देखील शिवसेनेत दाखल होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tesla Roadster Video : 'हवेत उडणारी कार'? Elon Musk यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरवले; सेकंदात ६०ची स्पीड अन् ग्रॅव्हिटीची ऐशीतैशी...

Sunlight at Night: आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिकेची कंपनी भारताच्या मदतीने अंतराळात पाठवणार ‘स्पेस मिरर’... कसं करणार काम?

Navi Mumbai: १० टक्के पाणीकपात हटणार, नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा मिळणार; गणेश नाईकांची मोठी घोषणा

Marathi News Live Updates: निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडले, उत्तर अहिल्यानगरमधील नागरिकांना मोठा दिलासा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा

Water Conservation: दुष्काळी धाराशिवला ‘एआय’चे वरदान! उसासाठी पाण्याचा भरमसाठ उपसा टळला; ७७० शेतकऱ्यांच्या प्रयोगाने बदलले चित्र

SCROLL FOR NEXT